ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध दारू विक्रेत्याकडून पाठलाग करणाऱ्या पोलिसाची हत्या

अन्य एक पोलिस जखमी ; पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या भरधाव दुचाकीला मारली लाथ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

अवैध दारू पकडण्यासाठी पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या भरधाव दुचाकीला अवैध दारू विक्रेत्याने लाथ मारली, त्यामूळे भरधाव वेगात असलेली दुचाकी अनियंत्रित होऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर आदळली या मध्ये एक पोलिस कर्मचारी जागीच ठार झाला तर अन्य एक पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे सदर घटना 23 मार्च रोजी दुपारी मिसळवाडी ते शेळगाव आटोळ रस्त्यावर घडली, भागवत गिरी असे मृतक पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे, तर जखमी पोलिस कर्मचाऱ्याचे नाव रामेश्र्वर आंधळे आहे. या प्रकरणी अवैध दारू विक्रेता आरोपी संजय शिवणकर याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, अंढेरा पोलिस स्टेशन चे पोलीस कर्मचारी रामेश्र्वर आंधळे व भागवत गिरी हे मोटार सायकल एम एच 28 ए एच 1609 ने ग्रस्त घालीत असताना अवैध देशी दारू चे बॉक्स वाहून नेणाऱ्या वाहनाची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ त्या गाडीचा पाठलाग केला. पाठलाग करताना आरोपीने पोलीसांच्या दुचाकीला लाथ मारली, त्यामूळे भरधाव वेगात असलेल्या दुचाकी वरील नियंत्रण सुटले आणि झाडावर आदळली या भिषण अपघातात भागवत गिरी यांच्या डोक्याला जबर मार बसला त्यामूळे त्यांचा जागीच मृत्यू झाला तर रामेश्र्वर आंधळे गंभीर जखमी झाले, घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले, मृतक पोलिस भागवत गिरी यांचा मृतदेह चिखली येथील रुग्णालयात हलविण्यात आला तर जखमी पोलिस रामेश्र्वर आंधळे याला तातडीने चिखली येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले..

अंढेरा पोलिस स्टेशन च्या हद्दीत अवैध देशी दारू विक्री, रेती ची अवैध वाहतूक, आणि जुगार खुले आम सूरू असल्याची चर्चा आहे, नुकतेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक रुपेश शक्करगे हे अवैध धंद्यावर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरले असा आरोप केला जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांना माहिती मिळताच एल सी बी टीमला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले, एल सी बी पथक व अंढेरा पोलिसांनी तपास चक्रे वेगाने फिरवून फरार आरोपी संजय शिवणकर याला अटक केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये