ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रासेयो तर्फे निमणी येथे आरोग्यविषयक विविध तपासणी शिबिराचे आयोजन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरा मार्फत महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स गडचांदूर ने सुष्मजिवशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक 4 फेब्रुवारी 2025 ला रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी शिबिर आयोजित केले होते.

यात या तपासणीमध्ये गावातील समस्त बालक वृद्ध महिला यांचे रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आले. सर्व शिबिरार्थ्यांनी गावातील समस्त गावकऱ्यांना शिबिरास्थळी बोलून त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत सल्ला मसलत करण्यात आले. त्याचबरोबर दिनांक 5 फेब्रुवारी रोजी पशुवैद्यकीय चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये गावातील गायी, म्हशी यांच्या वेगवेगळ्या तपासण्या करण्यात आल्या व त्यांच्या उपाययोजनांचे निदान करण्यात आले. दिनांक 6 फेब्रुवारीला सिकलसेल कॅम्प, मेडिकल कँप, राष्ट्रीय फ्लिरोसिस नियंत्रण कँप अश्या विविध प्रकारच्या आरोग्यविषयक तपासनि शिबिर आयोजित करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये