चोरट्यांनी लाकडी कपाटाचे लॉकरमधून दागिने केले लंपास
संपूर्ण मुद्देमाल जप्त ; आरोपीस अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सविस्तर असे की, फिर्यादी विलास नारायनराव ढोमणे, वय 52 वर्ष, रा. पद्मावती नगर, आलोडी, वर्धा, ता.जि. वर्धा हे परीवारासह नातेवाईका कडे कार्यक्रमा करीता गेले असतांना व त्यांची मुलगी कॉलेज ला गेली असतांना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे घराचे लाकडी कपाटाचे लॉकरमध्ये ठेवुन असलेले सोण्याचे दागीने जु की2,11,000/- रु चा माल चोरुन नेल्याने फिर्यादी यांनी पो स्टे ला येवुन तक्रार दिल्याने सदरचा गुन्हा नोंद करुन तपासात घेतला. सदर गुन्ह्याचे तपास दरम्याण आरोपीतांनी चोरी केलेला माल नवेगाव येथे विकण्या करीता घेवुन गेले अशी माहीती प्राप्त झाल्याने नवेगाव येथे जावुन आरोपी 1) ऋषभ विनोद मेंढे, वय 20 वर्ष, रा. हणुमान नगर, वैभव नगर जवळ, वानाडोंगरी, हिंगणा रोड नागपुर ता.जि. नागपुर, 2) ऋषिकेश रवि कुंभरे, वय 20 वर्ष, रा. यशोदा नगर, जयताळा, नागपुर, ता.जि. नागपुर यांना अटक करुन त्यांचे कडुन गुन्ह्यातील चोरुन नेलेला संपुर्ण माल व गुन्हयात वापरलेले मोबाईल व एक चारचाकी वाहन जप्त करुन आरोपींना अटक करुन गुन्हा उघडकीस आनला.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक सा वर्धा, अपर पोलीस अधिक्षक सा वर्धा, उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा यांचे मार्गदर्शनात परी.पोलीस उपअधीक्षक प्रतीक्षा खेतमाळीस,सपोनी विनीत घागे, पोउपनी वाल्मीक बांबर्डे, पोहवा सचिन सोनट्टके, अजय वानखेडे, पो.ना. धिरज मिसाळ, संजय लाडे, पोशि अभय ईंगळे, प्रदिप कुचनकर यांनी केली.