विश्वशांती विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार
भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे ७६ वा प्रजासत्ताक दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सर्वप्रथम भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीपभाऊ गड्डमवार यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून शाळा समिती अध्यक्ष अनिलभाऊ स्वामी कोषाध्यक्ष डॉ.विजय शेंडे,नगराध्यक्ष लताताई लाकडे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत राईंचवार,नगरसेवक विजय मुत्यालवार,प्रफुल वाळके, गुणवंत सुरमवार,पल्लवी ताटकोंडावार,राकेश ताटकोंडावार, माजी सभापती मोतीलाल दुधे,चरणदास बोम्मावार, केवलराम खेवले,कविता मुत्यालवार, अँड.हरिभाऊ संतोषवार,गावतुरे, जक्कुलवार सर, विश्वशांती कॉन्व्हेन्टचे प्राचार्य पांडुरंग अमृतवार,पर्यवेक्षक मधुकर जाधव उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनी शाळेच्या प्रांगणात मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी कवायती,मनोरे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि भाषणे सादर केली.शालेय,तालुका,जिल्हा स्तरावर आयोजित केलेल्या गेलेल्या विविध स्पर्धांमध्ये मानांकन मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार यांनी विद्यालयामध्ये वर्षभरामध्ये घेत असलेल्या उपक्रमाबद्दल माहिती देऊन प्रजासत्ताक दिनाचे महत्व समजावून दिले.
कार्यक्रमाचे संचालन विद्यालयाचे शिक्षक राजू केदार व शिक्षिका वनिता गेडाम यांनी केले तर आभार सहाय्यक शिक्षक धनंजय गुरनुले यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयाचे शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गांचे सहकार्य लाभले.