ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बोथली येथे बिपीएल.२ क्रिकेट स्पर्धा संपन्न

स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

सावली तालुक्यातील बोथली येथे गाव पातळीवर उत्कृष्ठ खेळाडू निर्माण व्हावे या करिता सलग दुसऱ्या वर्षी नवीन वर्षाचे औचित्य साधून बोथली प्रीमियर लीग २ चे आयोजन करण्यात आले.आयोजित क्रिकेट स्पर्धेत बोथली गावातील एकूण १६ संघांनी यात सहभाग नोंदविला.त्यात सलग दुसऱ्यांदा अष्टविनायक क्रिकेट क्लब वार्ड क्रमांक २ ने प्रथम क्रमांक पटकाविला तर द्वितीय क्रमांक नवयुवक क्रिकेट क्लब आणि तृतीय क्रमांक शिवसेना क्रिकेट क्लब यांनी पटकाविला.

विजेत्या संघाला रोख पारितोषिक आणि चषक देऊन गौरविण्यात आले. क्रिकेट स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी चंद्रकांत कोल्हाटवार,नवनीत गड्डमवार,प्रतीक वरगंटिवार,पोलीस पाटील ताराचंद खोब्रागडे,तसेच गावातील युवक मंडळींचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये