ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विवेक बोढे यांच्या पुढाकारातून लखलखनार सारिपुत्त बुद्धविहाराचा परिसर 

चांदा ब्लास्ट

घुग्घुस येथील सारिपुत्त बुद्धविहार गांधीनगर व सुभाषनगर चा परिसर भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या पुढाकारातून लखलखनार आहे.

सारिपुत्त बुद्धविहाराचे सौंदर्यीकरण व विविध विकासकामे करण्यासाठी सारिपुत्त बुद्धविहाराच्या महिला मंडळाने भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांना निवेदन दिले होते.

भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या पुढाकारातून सारिपुत्त बुद्धविहार परिसरात हायमास्ट लाईट लावण्यात येणार आहे.

गुरुवार, २९ ऑगस्ट रोजी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी सारिपुत्त बुद्धविहाराला भेट दिली.

याप्रसंगी भगवान गौतम बुद्ध, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला माल्यार्पण करून अभिवादन केले. सारिपुत्त बुद्धविहार महिला मंडळाच्या वतीने पुष्प देऊन भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांचे स्वागत करण्यात आले तसेच हायमास्ट लाईट लावण्याच्या ठिकाणी पाहणी करण्यात आली.

यावेळी माजी सरपंच संतोष नुने, भाजपाचे इर्शाद कुरेशी मंडळाच्या अध्यक्षा अल्का चुनारकर, उपाध्यक्षा अनिता कोल्हे, कोषाध्यक्षा सुमित्रा सोनटक्के, सहसचिव मंदाकिनी तेलसे सदस्या शिला पडवेकर, मंजु निखाडे, चंदा जिवनकर, शकुंतला कांबळे, ज्योती रत्नपारखी, प्रज्ञा पडवेकर, नंदा नगराळे, भरती निमसटकर, आशु मजगवळी आदींची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये