वरोरा तालुक्यात अवैध दारू विक्री चा महापूर
पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष : तात्काळ विक्री बंद करा : तुलसी अलाम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
वरोरा तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात अवैध दारुविक्री, सट्टापट्टी व जुगार चालू आहे. मात्र याकडे वरोरा च्या पोलीस प्रसासनाचे अजिबात लक्ष नाही वरोरा शहरात व जामगांव (बु ), बोर्डा परिसरात अवैध दारुविक्रीचा महापूर, जुगार व सट्टापट्टी होत असल्यामुळे वरोरा तालुक्यातील युवकांचे व विद्यार्थ्याचे खूप मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे अवैध दारुविक्री,सट्टापट्टी व जुगार तात्काळ बंद करावी अशी मागणी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे राजकीय कार्यकर्ते व पत्रकार, युवा नेते तुलसी अलाम यांनी केली आहे.
युवक व विद्यार्थी हा व्यसनाधीन होत आहे
खेडोपाड्यात गावा -गावात अवैध दारुविक्री, सट्टापट्टी, जुगार खूप मोठ्या प्रमाणात होत आहे.
मात्र याकडे वरोऱ्याच्या पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांचे व पोलीस निरीक्षकांचे अजिबात लक्ष नाही अशी परिस्तिती दिसत आहे. त्यामुळे युवा नेते तुलसी अलाम यांनी वरोरा तालुक्यातील व शहरातील जामगांव (बु ) येथे अवैध दारुविक्री, सट्टापट्टी व जुगार तात्काळ बंद करावी अन्यथा पोलीस कार्यालय वरोरा समोर युवकांच्या वतीने भव्य आंदोलन करू असा इशारा दिला आहे.