ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थिनींना स्व: संरक्षणाचे धडे

सदर प्रशिक्षणाचा विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय सावली येथे महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य राजमाता जिजाऊ युवती स्व:संरक्षण व जिल्हा उद्योजकता व कौशल्य विकास कार्यक्रम चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ते २५ वयोगटातील विद्यार्थिनींसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रशिक्षणाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार हे होते,तर शालेय विद्यार्थिनींना स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काय केले पाहिजे आणि त्यासाठी कोणत्या प्रकारच्या कायद्याचा वापर केला पाहिजे याविषयी डॉ.किरण बोरकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले,तसेच सायबर क्राईम व कायदेशीर मार्गदर्शक म्हणून बिंबिसार भसारकर कराटे प्रशिक्षक आर्यन बेडूककर आणि त्यांची चमू उपस्थित होती.
प्रशिक्षण कार्यक्रमाचे संचालन विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक प्रदीप कोहळे यांनी केले, सदर प्रशिक्षणाचा विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये