ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा जिल्हा पोलीसांनी गौवंश तस्करी करणारे ६ गुन्हेगारांना केले वर्धा जिल्ह्यातुन हद्दपार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्ह्यातील गुन्हेगारांचा समूळ उच्चाटन करण्याचे उद्देशाने वर्धा जिल्हयातील सर्व ठाणे प्रभारी यांना प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही करण्याचे आदेश मा. पोलीस अधीक्षक, श्री. अनुराग जैन यांनी दिले होते त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन खरांगणा हद्दीत गौवंश तस्करी करणारे आरोपी विरुध्द ठाणेदार, पोलीस स्टेशन खरांगणा यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ अन्वये १) अब्दुल रफिक अब्दुल कादर कुरेशी ववय ५३ वर्षे रा. आंजी मोठी जि. वर्धा २) नौशाद मोहम्मद बशिर कुरेशी वय ४० वर्षे रा आंजी मोठी जि. वर्धा ३) याकुब मोहम्मद बशिर कुरेशी वय ३७ वर्षे रा. आंजी मोठी जि. वर्धा ४) अल्ताब ऊर्फ सद्दाम मोहम्मद बशोर कुरेशी वय ३५ वर्षे रा आंजी मोठी जि. वर्धा ५) शेख फिरोज शेख हारुन वय ४१ वर्षे रा. आवी जि. वर्धा ६) जलिल ख्वाजा कुरेशी वप ४० वर्ष रा पुलफैल, वर्धा जि. वर्धा या सहा गुन्हेगारांवर हद्दपार कार्यवाहीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक वर्धा यांना सादर केला होता. पोलीस अधीक्षक वर्धा श्री. अनुराग जैन यांनी गौवंश तस्करी करणारे टोळी यांची गंभीर दखल घेवून प्रस्तावाची दखल घेत आरोपीची गुन्हे करण्याची पध्दत व महाराष्ट्र पोलीस कायदा या सुक्ष्म अभ्यास करुन महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ५५ नुसार नमुद सहा सराईत गुन्हेगार यांना दिनांक २९.०४.२०२३ रोजी दोन (०२) वर्ष कालावधी करीता वर्धा जिल्ह्याचे हद्दीबाहेर हद्दपार करण्याचे आदेश दिले आहे. नमुद तडीपार करण्यात आलेल्या इसमाची टोळी संयुक्तीकरीत्या गुन्हे करण्याच्या सवयीचे असुन त्यांचे विरुध्द पोलीस स्टेशन खरांगणा येथे महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ अंतर्गत शिक्षापात्र गुन्हे या सारख्या गुन्हयांची वर्धा जिल्हयाचे अभिलेखावर नोंद आहे. या अभिलेखावरुन त्यांचा गुन्हेगारी पूर्व इतिहास लक्षात घेता वर्धा जिल्हयातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था आबाधीत राहण्या करीता त्यांचेविरुध्द हदपारीचे आदेश जारी करण्यात आले आहे.

भविष्यात सुध्दा गुन्हेगारांवर तसेच अवैध व्यवसायात गुंतलेल्या गुन्हेगारांवर व गौवंश तस्करी करणारे गुन्हेगार यांचेवर चपराक बसण्याकरीता अशाच प्रकारची प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक वर्धा श्री. अनुराग जैन यांनी सर्व अधिनस्थ ठाणे प्रभारी यांना दिलेले आहेत. सदरची कामगौरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक, डॉ. सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात पो.नि. विनोद चौधरी, स्थानिक गुन्हे शाखा वर्धा, स.पो.नि. सदाशिव ढाकणे, पोलीस स्टेशन खरांगणा तसेच पो उप नि. ओमप्रकाश नागापुरे, पो.हवा रोशन निबोळकर यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये