ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध दारू वाहतूक रेड कारवाई

एकूण 3 लाख 17 हजारांवर मुद्देमाल जप्त करून आरोपी ताब्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 20.04.2024 रोजी CIU टीम ने पोस्टे देवळी हद्दीत प्रो. रेड करून बोपापुर दिघी आरोपी यांचे राहते घर परीसर देवळी येथे एकूण 3,17,400/-रु. चा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी 1)रोशन गजानन पचारे वय 22 वर्ष रा. बोपापूर दीघी ता. देवळी जि वर्धा 2) माल टाकणारा खुशाल कुंभारे रा. देवळी अटक करण्यात आली असून 1) एक मारुती सुझुकी अल्टो कार क्र MH 32 C 1297 किँमत 3,00,000/- ₹ 2) 180 मिली चे प्रीमियम कंपनीचे देशी दारूने भरलेल्या एकूण 116 बॉटल किँमत 17,400/-₹ असा एकूण 3,17,400/-₹ चा मुद्देमाल आरोपी यांचे घराचे वारांड्यातून तसेच गाडीचे डीक्कीतून जप्त करण्यात आला.

       गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल पो. स्टे. देवळी चे डुटी ऑफिसर पोहवा कुरसंगे व स्टाफ यांचे ताब्यात देण्यात आले.

      कारवाई पथक पोलिस अधीक्षक, वर्धा नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, स्था.गु.शा. यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. मंगेश भोयर, पो. हवा. रोशन निंबोळकर, पो. अम. संदिप गावंडे, केलास वालदे, प्रदीप कूचनकर, सुगम चौधरी सर्व विशेष पथक, स्था.गु.शा. वर्धा म.पो.शि. स्मिता महाजन, सायबर सेल, वर्धा तसेच चालक पो.अ. शुभम बहादुरे, पो.मु. वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये