Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

सीएमपीएलने केला पाच डॉक्टरांचा आरोग्य भूषण पुरस्कार देत सन्मान

मेडिकल प्रीमियर लीगच्या पाचव्या पर्वाचा पार पडला लिलाव सोहळा

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर मेडीकोजअसोसिएशन चंद्रपूर द्वारा आयोजित चंद्रपूर मेडिकल प्रीमियर लीग च्या पाचव्या पर्वाचा लिलाव सोहळा आज रोटरी क्लब येथे पार पडला. त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील गुणवंत नामांकित वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असलेल्या मान्यवरांना आरोग्य भूषण 2025 सन्मान देऊन त्यांना गौरवण्यात आले.

चंद्रपूर येथील सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. अशोक भुक्ते, माधवबाग चंद्रपूरचे संचालक डॉ. लक्ष्मीनारायण सरबेरे, होमिओपॅथिक तज्ञ डॉ. गोसावी बोढे तसेच डॉ. कार्तिकेश गोखरे, सुप्रसिद्ध दंतशल्य चिकित्सक डॉ. प्रवीण घोडे तसेच समाजसेवक व वैद्यकीय व्यावसायिक श्री पंकज देशमुख यांना पुरस्काराने गौरवण्यात आले. याप्रसंगी डॉ. अशोक भुक्ते यांनी रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असून मागील 40 वर्षापासून रुग्णाप्रति असणारी आस्था व निष्ठा आजही कायम असल्याबाबत सांगितले. डॉ. लक्ष्मीनारायण सरबेरे म्हणाले की वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांना गौरविल्याने समाजसेवेचे कार्य करण्यास बळ मिळेल.

चंद्रपूर मेडिकोज असोसिएशन द्वारा देण्यात येणारे आरोग्य भूषण हा पुरस्कार चंद्रपूर जिल्ह्यातील वैद्यकीय सेवेची निगडित असलेल्या सर्व वैद्यकीय व्यावसायिकांना समाजात आदर व मान मिळवून देईल याबद्दल तिळमात्र शंका नसल्याचे प्रतिपादन संघटनेचे अध्यक्ष डॉ. किशोर भट्टाचार्य यांनी केले. या कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी संघटनेचे सचिव उमेश वासलवार, डॉक्टर रिमांशू तावाडे ,गुणवंत खोब्रागडे, सुरेश धर्मपुरिवार, अनुप येडलावार, सचिन खोब्रागडे, व पप्पू गेडाम यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुणवंत खोब्रागडे व आभार प्रदर्शन डॉ. रिमांशू तावडे यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये