Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

 ‘लॉयड्स कप चंद्रपूर प्रीमियर लीग’ स्पर्धेची उत्साही सुरूवात

26 जानेवारी पर्यंत चालणार स्पर्धा, 10 संघ विजेतेपदासाठी करणार संघर्ष

चांदा ब्लास्ट

लॉयड्स कप चंद्रपूर प्रीमियर लीग CPL टी 20 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचा आज उत्साही प्रारंभ झाला. शहरातील लाईफ फाउंडेशन च्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा स्पर्धेचे 11 वे पर्व आहे. स्थानिक रामनगरच्या सेंट मायकेल शाळा मैदानावर या स्पर्धेसाठी अथक परिश्रम करून मैदान खास तयार केले गेले आहे. 16 खेळाडूंचा समावेश असलेल्या 10 चमु यात सहभागी झाल्या आहेत.

 रविवारी सकाळी या क्रिकेट कार्निव्हलचा प्रारंभ मनपाचे मुख्य अभियंता विजय बोरीकर, लॉयड्सचे घुग्गुस युनिट हेड वाय.जी. एस. प्रसाद, ख्यातनाम व्यावसायिक चंद्रकांत वासाडे, सेंट मायकेल शाळेचे प्राचार्य श्री विकास कोल्हेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत लाईफ फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते पीच पूजा करून नारळ फोडण्यात आला.

मान्यवरांच्या उपस्थितीत दोन्ही संघांच्या खेळाडूंचा परिचय करून देण्यात आला. खेळभावनेचा जयजयकार करणारे फुगे आकाशात सोडण्यात आले. आपल्या शुभेच्छापर संबोधनातून सर्व संघांनी पंच निर्णयाचा आदर राखून स्पर्धा सफल करण्याचे आवाहन मान्यवरांनी केले. सोमवारपासून दररोज 2 लीग सामने खेळविले जाणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना रविवार 26 जानेवारी रोजी खेळविला जाणार आहे. विजेत्या संघाला १ लाख २1 हजार १११ रु. व लखलखती ट्रॉफी दिली जाणार आहे. स्पर्धेच्या यशासाठी लाईफ फाउंडेशन चे अध्यक्ष संजय तुमराम, उपाध्यक्ष आरीफ खान, नाहीद सिद्दीकी,सचिव सुनील रेड्डी, कोषाध्यक्ष बॉबी दीक्षित, सदस्य शैलेंद्र भोयर, डॉ. किशोर भट्टाचार्य, रईस काजी, आर्किटेक्ट वसीम शेख, कमल जोरा, प्रकाश सुर्वे, जितेंद्र मशारकर, आशीष अम्बाडे कार्यरत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये