Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

शिवसेना युवासेना चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणीची नव्याने निवड

चांदा ब्लास्ट

चंद्रपुर : शिवसेना युवासेना चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणीची नव्याने निवड करण्यात आली असून, यामध्ये युवासेनेच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती प्रक्रिया पार पडली.

युवासेना सचिव किरण साली, शिवसेना प्रवक्ता राहुल लोंडे, युवासेना सचिव (पूर्व विदर्भ) सुभम नवले, तसेच कार्यकारिणी सदस्य हर्षल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख शैलेश केळझरकर यांच्या नेतृत्वात ठाकरे गटाचे चंद्रपूर विधानसभा उपजिल्हाप्रमुख: प्रभाकर कुम्मरी, चंद्रपूर शहर सचिव: सुहास बारसागडे, चंद्रपूर तालुका समन्वयक: शिरीष शरद मानेकर, चंद्रपूर शहर उपप्रमुख: साहिल गणेश गाणफाडे, चंद्रपूर, बल्लारपूर विधानसभा समन्वयक: मनोज भाऊराव खांडेकर, वरोरा विधानसभा समन्वयक: मुनेश्वर बापुराव बदखल प्रमुख नियुक्त्या करण्यात आल्या.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना जिल्हा कार्यालयात नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी चेतन उजवणे, संदीप भोयर, कमलाकर कुळमेथे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

या नियुक्तींमुळे युवासेनेच्या जिल्हा कार्यकारिणीला नवीन ऊर्जा मिळाली असून, पक्षाच्या कार्याला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये