Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय
महात्मा गांधी विद्यालय येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य साईनाथ मेश्राम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे पर्यवेक्षिका लता घाटे व समिती प्रमुख प्रा. नंदा भोयर उपस्थित होत्या. सर्वप्रथम राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्रा नितीन वाढई यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला,संचालन व आभारप्रदर्शन वामन टेकाम यांनी केले. या कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.