Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

“स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा पथकाकडून अवैध दारूविक्रेत्यावर धडक कार्यवाही”

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दि 24/12/24 रोजी स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा चे पथक पोलीस स्टेशन समुद्रपुर परीसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करणेकरीता पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे मौजा वायगाव हळद्या येथे राहणारी छाया खोबरे हिचे राहते घराची झडती घेतली असता, झडती दरम्यान घराचे आतील रूममध्ये कोप-यात 04 खरर्ड्याचे खोक्यात व 3 प्लास्टीक पन्नीमध्ये तसेच फ्रिजमध्ये एका कापडी पिशवीमध्ये देशी दारूने भरलेल्या सिलबंद शिशा मिळुन आला.

असुन, सदर दारूचा माल हा अजय हजारे व साहिल डुमार यांनी आणुन दिल्याचे सांगितल्यावरून जागीचं मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून, आरोपीताचे ताब्यातुन देशी दारू कोकण संत्रा कंपनीच्या 90 एम.एल.च्या 800 सिलबंद शिशा कि 80,000 रू व एक सिल्व्हर रंगाची Haier कंपनीची फ्रिज कि. 12,000 रू असा जु.कि. 92,000 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी नामे 1) छाया रमेश खोबरे, वय 60 वर्ष, रा. वायगाव हळद्या तह. समुद्रपुर, 2) अजय हजारे, रा. सातगाव बुट्टीबोरी, 3) साहिल डुमार रा. समुद्रपुर यांचेवर पोलीस स्टेशन समुद्रपुर येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

  सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. अनुराग जैन सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. डॉ सागर कवडे सा., यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक मा.श्री. विनोद चौधरी सा. यांचे निर्देशाप्रमाणे, पो.अं. अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, अखिल इंगळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये