ने. हि. महाविद्यालयाच्या खेळाडूंचे महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघात निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 19 वर्षाखालील मुले व मुली राज्यस्तरीय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धा व निवड चाचणी मानकापूर स्टेडियम नागपूर घेण्यात आला.
राज्यस्तरीय सॉफ्टबॉल निवड चाचणी मध्ये कु. वसुंधरा अनंता झोडे हिने उत्कृष्ट असे प्रदर्शन करून शालेय महाराष्ट्र संघात त्यांची निवड करण्यात आली. औरंगाबाद येथे होणाऱ्या 19 वर्षाखालील राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघांचे प्रतिनिधित्व करण्यात येणार आहे.
ह्या खेळाडूंला संस्थेचे सचिव मा. अशोकजी भैया, प्रा. जी. एन. केला, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एच. गहाणे, डॉ. एस. एम. शेकोकर शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख,डॉ. एम. ए. शेख क्रीडा समिती अध्यक्ष, डॉ. के. एम. शर्मा, प्रा. आनंद भोयर, पर्यवेक्षक कनिष्ठ महाविद्यालय, श्री. संजू मेश्राम महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, क्रीडा समिती मधील सर्व सदस्य, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी शुभेच्छा दिल्या.
सत्कार कार्यक्रमा प्रसंगी सर्व निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. मुख्य प्रशिक्षक कोमल शेंडे, शेषराज खेडकर, शुभम वसाके यांच्या सत्कार करण्यात आला.