Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

दारूबंदी कायद्यानव्ये प्रो.रेड कार्यवाही

संपूर्ण मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

            पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे दिनांक 26/12/2024 रोजी पोस्टे परिसरात पेट्रोलिंग करीत Frends एक इसम त्याचे पांढऱ्या रंगाच्या मोपेड गाडीने स्मशाणघाट रोडणी दारुमाल घेऊन येत आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहीती मा.ठाणेदार मनोज गभने सा. यांना देवून त्यांचे आदेशाने गुन्हे प्रकटिकरण पथक व पोस्टाँप सह रवाना होवून मिळालेल्या माहीती प्रमाणे नाकेबंदी करून दारूबंदी कायद्यानव्ये प्रो.रेड कार्यवाही केली असता आरोपी सुनील शरबत भोसले वय 39 वर्ष रा. शिवानी पारधीबेडा ता. समुदपूर हा दारू वाहतूक करीताना मिळुन आल्याने त्याचे ताब्यातून 1) 04 प्लास्टिक पंनिमध्ये 80 लिटर गावठी मोहा दारू की. 12000/-रू 2) TVS मोपेड क्रमांक MH 32 AU 0578 की 80,000/-रू असा एकूण जु. कीं.92,000 रू चा गावठी मोहा दारू माल पचासमक्ष जप्त करण्यात आला असून आरोपी विरूध्द पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

ही संपूर्ण कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक अनुराग जैन साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक डाँ. सागर कुमार कवडे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत सा. यांचे निर्देशानुसार मा.मनोज गभने, पोलीस निरीक्षक सा. हिंगणघाट यांचे आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील डि.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना. राहुल साठे, विवेक वाकडे,पो.शी मंगेश वाघमारे,आशिष नेवारे, विजय काळे यांनी केली. सदर गुन्हयांचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये