Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

गोविंद पेदेवाड यांच्या शैक्षणिक प्रतिकृतीची जिल्हास्तर विज्ञान प्रदर्शनासाठी निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.  अशोक डोईफोडे

 तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कोरपना तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लालगुडा येथील प्रयोगशील शिक्षक गोविंद पेदेवाड यांनी सादर केलेल्या हसत खेळत गणित,विज्ञान नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रतिकृतीने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला.या प्रतिकृतीची जिल्हास्तर विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे.

गोविंद पेदेवाड यांनी बनवलेली ही शैक्षणिक प्रतिकृती जिल्हास्तरावर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.या यशाबद्दल त्यांच्यावर शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सदर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन कोरपना तालुक्यातील श्री.प्रभू रामचंद्र विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय नांदा येथे आयोजित करण्यात आले होते.

       शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासना तर्फे तालुकास्तरीय,जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले जाते.तालुक्यातील सर्व शाळा या विज्ञान प्रदर्शनात भाग घेतात व तालुक्यातून एक प्रतिकृती जिल्हास्तरावर निवडली जाते.जिल्हास्तरावर प्रत्येक तालुक्यातून निवडलेल्या प्रतिकृती मधून परीक्षण करून एका प्रतिकृतीची राज्यस्तरासाठी निवड केली जाते.असे या विज्ञान प्रदर्शनाचे स्वरूप असते.मान्यवरांच्या हस्ते पेदेवाड यांचा सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल कोरपना पंचायत समिती चे गटविकास अधिकारी विजय पेंदाम, गटशिक्षणाधिकारी सचिनकुमार मालवी, शिक्षण विस्तार अधिकारी कल्याण जोगदंड,लोकेश खंडारे,केंद्रप्रमुख पंढरी मुसळे, मुख्याध्यापक प्रकाश बोबडे,पालक,ग्रामस्थ, विद्यार्थी व शिक्षण प्रेमी यांनी अभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये