ताज्या घडामोडी

ॲड. यादवराव धोटे महाविद्यालयाची नॅक च्या ‘बी ग्रेड’ वर झेप

संस्थेचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी प्रयत्न करणार - संस्थाध्यक्ष ॲड. संजय धोटे

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

ॲड. यादवराव धोटे मेमोरियल सोसायटी राजुरा द्वारा संचालित ॲड. यादवराव धोटे स्मृति महाविद्यालय राजुरा येथे दि.10 व 11 डिसेंबर 2024 रोजी नॅक पियर समिती ने भेट दिली होती. या समितीमध्ये डॉ. मोहम्मद बशीर के. चेयरमन, माजी उप कुलगुरू कालिकत विद्यापीठ केरला (प्रो. डिपार्टमेंट ऑफ अरेबिक आसाम विद्यापीठ) रवींद्र भारती विद्यापीठ पश्चिम बंगाल येथील सदस्य को ऑर्डिनेटर डॉ. आदित्यप्रसाद मित्रा तसेच शासकीय पदवी महाविद्यालय अनंतनाग, कश्मिर येथील प्राचार्य मुजाफर अहमद भट ह्यांचा समावेश होता. महाविद्यालयात समिती चे आगमन होताच संस्थेचे सचिव ॲड. डॉ. अर्पित धोटे, स्मृती महाविद्यालयाच्या प्राचार्या मीनाक्षी कालेश्वरवार यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा सत्कार केला. समितीने पहिल्याच दिवशी महाविद्यालयातील प्रत्येक विभागाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी उपलब्ध सोई सुविधा तसेच युजीसी च्या नियमानुसार करावयाच्या सुधारणांबाबत सूचना दिल्या. त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व पालकांशी प्रत्यक्ष संवाद साधला.

सांस्कृतिक विभाग प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यात प्रत्येक राज्याची संस्कृती दर्शविणारा फॅशन शो विद्यार्थ्यांद्वारे सादर करण्यात आला तसेच एकल नृत्य आणि समूह नृत्य सादर करण्यात आला यानंतर प्रत्येक विभागातील प्राध्यापकांनी आपल्या विभागातील उत्कृष्ट माहिती सांगितली. याकरिता संपूर्ण प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर वृंद यांनी अथक परिश्रम घेतले याचेच फलित म्हणून दि. 20 डिसेंबर रोजी महाविद्यालयाला ‘बी ग्रेड’ देऊन नॅक पिअर समूहाद्वारे मुल्यांकन करण्यात आले

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.संजय धोटे, सचिव ॲड. डॉ. अर्पित धोटे, कोषाध्यक्ष सतीश धोटे, संस्थेच्या सदस्या डॉ. अश्विनी बल्की, यांनी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या, आय. क्यू. ए. सी कोऑर्डिनेटर तसेच संपूर्ण प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी, सर्व विद्यार्थी, माजी विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे तथा पालक मान्यवरांचे अभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये