Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

वर्धा येथे संविधान प्रेमी विचारमंच तर्फे मनुस्मृतीचे दहन!

अमित शाह यांना गृहमंत्री पदावरुन बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री यांनी संसदेत केलेल्या अपमानजनक वक्तव्याचा जाहीर निषेध आम्ही संविधान प्रेमी भारताचे नागरिक, लोकशाही मार्गाने करीत आहोत.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संसदेत अवमान करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना तातडीने पदावरून बडतर्फ करावे.या मागण्यांसाठी वर्धा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ सिव्हिल लाईन परिसरात आज दिनांक २५ डिसेंबर २०२४ रोजी मनुस्मृतिचे दहन करुन संविधान प्रेमी नागरिकांनी व मंचच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले आहे.

या आंदोलनावेळी शेखर शेंडे,मनोज चांदूरकर,उदय मेघे,सुनिल राऊत नितेश कराळे, बाळासाहेब इंगोले,राहुल झामरे, प्रमोद बोंबले, सुदाम पवार,नरेंद्र मसराम,सुरेश ठाकरे,बाळा माऊसकर, धर्मदास मानकर, प्रशांत भगत, मदनसिंग धमाने,विनोद टेंभरे,धीरज ताकसांडे,दुर्गाताई काकडे, रिंकू घोडेस्वार, सोनाली कुपलवार,अर्चनाताई भोमले,यशवंत झाडे,किशोर खैरकार,आशिष सोनटक्के, अशोक चोपडे,धर्मपाल ताकसांडे,अरविंद नकोसे, करुणा तेलतुंबडे,नामदेव चांहादे,भीमा शंभरकर, नरेन्द्र सुरकार, दादू शंभरकर,रमेश निमसडकर, स्मिता नगराळे, समाधान पाटील, अमित देशभ्रतार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचा निषेध करुन विचार व्यक्त केले.भीम सैनिकांमध्ये मंगेश सूर्यवंशी,सुरज बडगे,सोनू सहारे,सौरभ हातोले,आकाश खरे,राहुल पिंपळकर,संजोग मेश्राम,अमित गजभिये, रोहित यादव,प्रशांत कांबळे, बंडू फुलमली ,दादू दोटे, प्रकाश कोरडे ,दिनेश ताकसांडे, जाहीर अली,प्रवीण कांबळे ,अमित नाईक, पंकज लभाने,सुरज बडगे,विनोद सोलकी,अहमद पठाण,विकास झझाळ, संविधान प्रेमी विचार मंच तर्फे केंद्र सरकार व गृह मंत्री अमित शहा यांचा तीव्र निषेध करून संविधान जिंदाबाद… डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा दिल्या.त्या अगोदर सुरवातीला संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि मनुस्मृतीचे दहन केले.असे आंबेडकरी नेते महेंद्र मुनेश्र्वर , विशाल रामटेके यांनी प्रसिद्धी केलेल्या पत्रकातून कळविले आहे.

यावेळी या धरणे निषेध आंदोलनात आंबेडकरी बहुजन अल्पसंख्यांक पुरोगामी धर्मनिरपेक्ष विचाराच्या पक्ष व संघटना नेत्यांचा आणि भारतीय संविधानाला मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने समावेश होता.या फुले शाहू आंबेडकरी पुरोगामी धर्मनिरपेक्ष विचाराच्या नेते व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या मनुवादी विचारधारे विरोधात तीव्र निषेध नोंदवून आज क्रांतीसुर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक क्रांतीचा जयजयकार केला आहे.

संपूर्ण देश भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना केंद्र व राज्यकर्त्यांकडून भारतीय संविधानाची पायमल्ली केली जात आहे.देशाच्या संसदेत भारतीय संविधानाची व संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही केली जात नाही.

भारतीय संसदेच्या सभागृहात देशाच्या गृहमंत्र्यांकडून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी उल्लेख करून हिंदुत्वाचे सोंग करून देशात दैववादाचा पुरस्कार केला जातो हे निंदनीय आहे,आम्ही भारताचे नागरिक,मूर्ख केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व केंद्र सरकारचा जाहीरपणे तीव्र निषेध करतो अशी भुमिका प्रास्ताविकातुन महेंद्र मुनेश्वर यांनी मांडली.विशाल रामटेके यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये