Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स गडचांदूरमध्ये सिकल सेल अनीमिया विषयक स्क्रिनिंग कॅम्पचे आयोजन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स गडचांदूर येथे सिकल सेल अनीमिया रोगाची स्क्रिनिंग करण्याकरिता डॉ. देवेंद्र लिंगोजवार यांच्या सहाय्याने कैंप घेण्यात आला. डॉ. लिंगोजवार यांच्या स्वयंसेवी संस्था अदिटेक बायोटेक व महात्मा गाँधी कॉलेज ऑफ़ साइंस गड़चांदुर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार महात्मा गांधी कॉलेज आणि आदिटेक बायोटेक हा प्रकल्प एकत्रितपणे विद्यार्थ्यांच्या सिकल सेल अनीमिया चाचणीसाठी कार्यरत असतील. सिकल सेल अनीमिया स्क्रीनिंग करीता लागणारे सर्व साहित्य या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव व डॉ. उत्कर्ष मून यांच्याकळे सोपवण्यात आले. या कैंप मधे महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायंस गडचांदूर व महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयातील 100 विद्यार्थ्यांची स्क्रिनिंगटेस्ट करण्यात आली.

या प्रकल्पाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सिकल सेल अनीमिया विषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्या दृष्टीने योग्य उपचार मिळवणे हा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या कार्यक्रमात श्री. साईनाथ मेश्राम, मुख्याध्यापक महात्मा गाँधी विद्यालय, गड़चांदुर व डॉ शैलेन्द्र देव, प्राचार्य, महात्मा गाँधी कॉलेज ऑफ़ सायन्स गड़चांदुर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ शैलेन्द्र देव व डॉ उत्कर्ष मून हे या प्रकल्पाचे समन्वयक असणार आहेत. डॉ. देवेंद्र लिंगोजवार यांना भेटलेल्या ओ एन जी सी, इंडियाच्या प्रोजेक्ट अंतर्गत हा कैंप घेण्यात आला.

या कार्यकामाला बहुसंख्य विध्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर वृंद उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये