Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

प्रभाग क्रमांक 3 मधील अवैध दारू धंदे बंद करा : अमोल मांढरे

चांदा ब्लास्ट

घुग्घुस (चंद्रपूर) : प्रभाग क्रमांक 3 मध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध दारू धंद्यामुळे प्रभागातील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यांच्या तक्रारी गांभीर्याने घेत या समस्येबाबत वॉर्डवासीयांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख अमोल मांढरे यांच्यामार्फत पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना निवेदन दिले आहे.

 निवेदनात वॉर्डवासीयांनी अवैध दारू धंद्यामुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक व कौटुंबिक समस्यांचा उल्लेख करून तो त्वरित बंद करण्याची मागणी केली आहे. या व्यवसायामुळे प्रभागातील वातावरणावर विपरीत परिणाम होत असून स्थानिक रहिवाशांच्या शांततेला भंग होत असल्याचे त्यांनी सांगितले.

 ही बाब पोलिस प्रशासनाने गांभीर्याने घेऊन अवैध धंद्यांवर कडक कारवाई करावी, असे आवाहन अमोल मांढरे यांनी केले आहे. यावर तत्काळ कारवाई न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्ष व प्रभागवासीय एकत्रितपणे आंदोलन करण्यास भाग पाडू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये