Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ग्राम पंचायत पांगरी/डोईफोडे वाडीचा अभिनव उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

     जि.प.उ.प्रा.शाळा पांगरी येथे भविष्यवेधी वर्गखोली मंजूर झाली असून त्यासाठी 20×60 फूट च्या प्रशस्त हाॅलची गरज निर्माण झाली आहे. महापरिनिर्वाण दिनीच्या ग्रामसभेत शाळेने ही बाब ग्रामसभेच्या निदर्शनास आणून देताच सरपंच,ग्राम विकास अधिकारी तथा ग्राम पंचायत सदस्यांसह सर्व ग्रामस्थांनी गांभीर्याने प्रतिसाद देत उत्स्फूर्त पुढाकार घेतला. साधारणतः यासाठी १४ते १५ लाखांपर्यंत खर्च अपेक्षित असल्याने ग्रामपंचायतीच्या वित्त आयोगातून ५ लाख देऊ करत ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला तर ग्राम विकास अधिकारी यांनी व्यक्तीश: ११ हजार रुपये देऊन लोकवर्गणीचा श्री गणेशा केला.तसेच सदर ग्रामसभेने या कार्यास्तव जमा होणारी लोकवर्गणीस घरपट्टीरुप मानून संबंधितांना करमुक्त करण्याचा निर्णय घेतल्याने नवा आदर्श निर्माण केला.

        त्याच दिवशी सायंकाळी ८ वाजता ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात गावातील विविध सर्व समित्यांना एकत्रित बोलवून मनोदय व्यक्त केला असता अनेक दात्यांनी तात्काळ मदतीचा हात दिला व पुढील कार्य नियोजन तयार करण्यात आले.

         नियोजनाप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजता भैरवनाथाच्या आरतीनंतर उपस्थित सर्व ग्रामस्थांना शालेय निकड समजावली असता सर्वांनी एकमुखी होकार देत पुढाकार घेतला. प्रसंगी शाळेच्या शिक्षकवृदांच्या वतीने मुख्याध्यापकांनी ५१०००/-रु.चा धनादेश ग्रामस्थांना सूपूर्द केला.उपस्थित ग्रामस्थांनी देखील मदतीचा ओघ सुरू केला.

       गावातील सर्व स्तरांतील ग्रामस्थांसह ग्राम पंचायत,शाळा व्यवस्थापन समिती, तंटामुक्ती समिती,मंदीर समिती,सहकारी संस्था, महिला गट,पालक वर्ग तसेच तरूण मित्र परीवारांसह सर्व आजी/माजी विद्यार्थी यांचा सक्रीय सहभाग व प्रतिसाद मिळत आहे.

       दिनांक ६ डिसेंबरपासून सुरु झालेली ही मोहीम दिनांक २३ डिसेंबर २०२४ रोज सोमवारला सायंकाळी ६ वाजता आयोजित लेकरांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सक्रीय सहभाग या विषयावर आधारित लोकप्रिय आदर्श सरपंच मा. भास्करराव पेरे पाटील यांच्या खुमासदार शैलीतील जाहीर व्याख्यान झाले, या माध्यमातून ही लोकचळवळ होऊ पाहत आहे. याप्रसंगी माजी आमदार

डॉ. शशिकांतजी खेडेकर

गटविकास अधिकारी महोर,गटशिक्षणाधिकारी मुसदवाले, सुदाम काकड, आदर्श सरपंच दिपक पवार, सचिन व्यास, केंद्र प्रमुख कुमटे, ग्राम विकास अधिकारी आंधळे, दिनकर खरात, सर्व ग्राम पंचायत सदस्य, कर्मचारी, व गावकरी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये