ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अज्ञात इसमाकडून मोटार सायकलची चोरी

संपूर्ण मुद्देमाल जप्त ; गुन्हा उघडकीस

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशनला दिनांक. 23.05.2025 रोजी फिर्यादी नामे संदिप मधुकरराव श्रीरामे वय 40 वर्षे रा. योगेश चन्ने यांचे घरी किरायाने डाफे ले आउट पिपरी मेधे वर्धा यांनी तक्रार दिली की, दि. 20.05.2025 रोजी दाते मंगलकार्यालयाचे मागे नळफिटींगचे कामा करिता सकाळी 09.00 वा दरम्यान त्याचे मालकीची मो.सा क. एम.एच. 32 बी. 5707 ने गेले असता त्यानी मोटर सायकल गेटच्या बाहेर लावुन नळ फिटींगचे काम करण्याकरिता घरी जावुन काम करून घराचे बाहेर आले असता त्याचे मालकची मोटार सायकल हि दिसुन आली नाही व त्याची आजुबाजुच्या परिसरामध्ये शोध घेतला असता सदर मोटार सायकल मिळुन आली नाही तरी सदर मो.सा हि कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेली असे तक्रारीवरून पो.स्टेला दि. 23.05.2025 रोजी अप क. 362/25 कलम 303 (2), 3 (5) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा नोंद करून तपासामध्ये घेतला.

सदर गुन्हयात मुखबीर मार्फत खात्रीशीर मिळालेल्या खबरेवरून व सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेता व तपासची चर्के जलद गतीने फिरवुन वि.स.बा हा सदर गुन्हयातील आर्वी नाका परिसमरातुन ताब्यात घेवुन त्यास मो.सा बाबत सविस्तर विचारपुस केली असता त्यांनी गुन्हयातील मोटार सायकल तसेच इतर ठिकाणीवरून चोरलेल्या मोसा. 1) हिरो होंन्डा स्प्लेंडर प्रो काळया रंगाची कमांक एम.एच. 32 बी. 5707 किंमत 22,000/रू. 2) हिरो होंन्डा स्प्लेडर प्लस काळया रंगाची कमांक एम.एच. 29 एल. 4648 किंमत 25,000/रू. 3) हिरो होंन्डा स्प्लेंडर काळया रंगाची कमांक एम.एच. 32 एफ. 4926 किंमत 35,000/ रू. 4) हिरो होंन्डा स्प्लेडर निळ्या रंगाची कमांक एम.एच. 31 ए.टी 9359 किंमत 25,000/ रू.असा जु.किं. 1,07,000/रू चा माल पोलीस स्टेशन रामनगर येथे जप्त गुन्हया त्वरित उडकीस आणण्यात आला आहे.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अनुराग जैन सा. वर्धा, अप्पर पोलीस अधिक्षक सागर कवडे साहेब वर्धा, उपविभागीय पोलीस अधिकारी मकेश्वर साहेब वर्धा, पोलीस निरिक्षक बिपीन इंगळे यांचे मार्गदर्शनात, सफौ नितिन रायलकर, पोलीस हवालदार राजु राउत, पोलीस अंमलदार प्रकाश खार्डे, ज्ञानेश्वर आमनर पो.स्टे. रामनगर यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये