Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

वाघाच्या हल्यात बैल जखमी

मांगली शेतशिवारातील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         शेतात बांधून असलेल्या एका बैलावर वाघाने हल्ला करुन त्याला जखमी केल्याची घटना तालुक्यातील मांगली येथील जंगलालगत असलेल्या शेतशिवारात दिनांक २२ ला सकाळी ११.३० वाजताच्या दरम्यान घडली घडली. मांगली येथील शंकर कुमरे यांचे येथील जंगलालगत असलेल्या शिवारात शेत आहे.घटनेच्या दिवशी कुमरे यांनी सकाळच्या वेळी शेतातील तणसीच्या ढिगाऱ्याजवळ बैलाला चरण्यासाठी बांधुन ठेवले होते.या दरम्यान जवळपास दबा धरुन बसलेल्या वाघाने बैलावर हल्ला केला. यात बैल किरकोळ जखमी झाला.

या शिवारात सध्या मोठ्या प्रमाणात वाघाचा धुमाकूळ सुरु असुन वाघाच्या अस्तित्वाने परीसरातील गुराखी व शेतकऱ्यांमधे चिंतेचे वातावरण पसरले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये