Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

लंगडा मारुती मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्या आरोपीस अटक

भद्रावती पोलिसांची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

             भद्रावती शहरातील पंचशील नगर येथील जागृत लंगडा मारुती मंदिराचा दरवाजा तोडून मंदिरातील दानपेटीची चोरी करणाऱ्या आरोपीला भद्रावती पोलिसांनी अटक केली आहे. सदर कारवाई भद्रावती पोलिसातर्फे करण्यात आली. शुभम विठ्ठल झाडे, वय 29 वर्षे, राहणार झाडे प्लॉट भद्रावती असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदर आरोपीने 8 जून 2024 ला रात्रो सदर मंदिराचा दरवाजा फोडून जवळपास दोन हजार तिनशे रुपये असलेली दानपेटी पळवली होती. पैसे काढल्यानंतर आरोपीने सदर दानपेटी येथील डोलारा तलावात फेकून दिली होती.

सदर आरोपी हा नुकताच तेलंगाना राज्यात एका चोरीच्या प्रकरणात तेथील कारागृहात शिक्षा भोगत होता. तेथून सुटून आल्यानंतर त्याला भद्रावती पोलिसांनी अटक केली. सदर कारवाई भद्रावती पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात गजानन तुपकर, जगदीश झाडे, अनुप आष्टुनकर, निकेश ढेंगे, विश्वनाथ चुदरी योगेश घाटोळे व रोहित चिटगीरे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये