Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

चांदा पब्लिक स्कूल येथे एड्यु-फिस्ट २के२४चा भव्य शुभारंभ

चांदा ब्लास्ट

         दि. १९/१२/२०२४ ला चांदा पब्लिक स्कूल येथे एड्यु-फिस्ट २के२४ चा शुभारंभ मोठ्या जल्लोषात करण्यात आला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडून यावा याकरीता शैक्षणिक, कलात्मक, सांस्कृतीक कौशल्यावर आधारित विविध उपक्रमांचा सहभाग या आठ दिवसीय सोहळ्यात करण्यात आला.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. जरील बेनाइट, प्रसिद्ध चर्मरोगतज्ञ व सामाजिक कार्यकर्ते, नागपूर, अजय जयस्वाल, माजी अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर, संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे, प्राचार्या आम्रपाली पडोळे उपस्थित होते. स्वागत गीता समवेत दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तद्वतच उपस्थित मान्यवरांचे हिरवे रोप व सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.

प्राचार्या आम्रपाली पडोळे या प्रास्ताविक भाषणात म्हणाल्या की, एड्यु-फिस्ट हा असा मंच आहे ज्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या सुप्त कला-गुणांना व ज्ञानाला चालना दिल्या जाते. विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होतात. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना एड्यु-फिस्ट करीता शुभेच्छा दिल्या. एड्यु-फिस्ट २के२४ चा प्रमुख उद्देश व त्याचे आयोजन याविषयी विस्तृत माहिती विद्यार्थीसंघ प्रमुख नाविण्या बत्तुलवार ने दिली.

शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे यांच्या द्वारा चार हाऊस मास्टर व हाऊस कॅप्टन यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी आठ दिवसीय एड्यु-फिस्ट २के२४ चा शुभारंभ झाला अशी घोषणा त्यांनी केली. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व स्वप्रतिभेस वाव देण्याकरीता सर्व स्पर्धांमध्ये सहभागी होण्याकरिता आवाहन दिले. तसेच त्या म्हणाल्या की, सर्वांगिण विकास होण्यासाठी पुस्तकी ज्ञानासोबतच, बौध्दिक कौशल्य, निर्णय क्षमता, सहनशिलता इत्यादिचा विकास करुन आपण आपले व्यक्तीमत्त्व प्रभावी करु शकतो.

कार्यक्रमाला लाभलेले मुख्य अतिथी डॉ. जरील बेनाइट हे या प्रसंगी म्हणाले की, एड्यु फिस्ट २के२४ हा एक स्तुत्य उपक्रम आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास ही व्यापक संकल्पना समोर ठेवून जागतिक पातळीवर राबविण्यात येत असलेल्या शाश्वत विकासाची (SDG) ध्येयपूर्ती एड्यु फिस्ट २के२४ च्या उपक्रमातुन साध्य होतांना दिसत आहे. याकरिता त्यांनी शाळा व्यवस्थापनाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

एड्यु-फिस्ट च्या प्रथम दिवशी आयोजित स्पर्धा फेस पेंटींग, कथाकथन, क्ले मॉडेलिंग, अभिवाचन, शब्दसंपदा, पायथन कोडींग इत्यादी सर्व स्पर्धांचे परीक्षकांनी भरभरुन कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलिमा पाऊनकर यांच्यासोबत आशुतोष पांडे, अभिलेष धात्रक, कृपा नायर, पिहु शुक्ला या विद्यार्थ्यांनी केले तर आभार प्रदर्शन मैत्री मेश्राम या विद्यार्थिनीने केले.

कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता एड्यु-फिस्ट २के२४ चे आयोजक महेश गौरकार, कार्यक्रम प्रमुख जेबा झाकिर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये