Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

शिवणी येथे राष्ट्रसंतांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने‌ जनप्रबोधन आणि श्री गुरुदेव सेवकांचा गौरव 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

      सिंदेवाही तालुक्यातील शिवणी येथे श्री गुरुदेव सेवा मंडळ आणि समस्त ग्रामस्थांच्या विद्यमाने तीन दिवसीय विविध उपक्रमांचे आयोजन श्रीगुरुदेव प्रार्थना मंदिर परिसरात करण्यात आले होते. दैनिक ग्रामसफाई , रामधुन , सामुदायिक ध्यान- प्रार्थना या कार्यक्रमासोबतच गावातील मंजुळामाता महिला भजन मंडळ , जय परसापेन आदीवासी महिला भजन मंडळ, दुर्गामाता महिला भजन मंडळ, सरस्वती महिला भजन मंडळ, भाग्यश्री महिला भजन मंडळ, श्री गुरुदेव आदिवासी भजन मंडळ च्या वतीने प्रबोधनपर भजनांचे सादरीकरण करण्यात आले.

   एच. सी. जी. हास्पिटल नागपूर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र वासेरा यांच्या वतीने आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरात मुखरोग तपासणी, स्तनांचे कर्करोग तपासणी, बी. पी. – शुगर तपासणी, आदी आजारांसंबधी मोफत वैद्यकीय तपासणी केली. यावेळी रूग्णांना या हास्पिटल चे डॉ. कमलजीत कौर तसेच पीएचसी चे डॉ. हुमणे यांनी मार्गदर्शन केले.

     समारोपाच्या दिवशी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर (चंद्रपूर) यांचे राष्ट्रसंतांच्या विचारांची प्रासंगिकता या विषयावर व्याख्यान झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विचार हा समग्र ग्राम परिवर्तनाचा विचार असून गावोगावी त्यांच्या ग्रंथांचे वाचन दैनंदिन झाले पाहिजे. त्यामुळे ग्रामसुधारण्याच्या कार्यास गती येईल , असे प्रतिपादन श्री. बोढेकर यांनी केले.व्याख्यानांप्रसगी श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे निष्ठावंत भैय्याजी निकुरे, महादेव उईके, सौ. सरिता निकुरे,सौ. अनिता पेंदाम , कीर्तनकार ज्ञानेश्वर केसाळे महाराज इत्यादींचा बंडोपंत बोढेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दिग्रस येथील ज्ञानेश्वर केसाळे महाराज यांचा गोपाळकाला कीर्तनाने सांगता झाली.

   मंदिर परिसरात आरास स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यात महिला भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.‌ कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. आशिष शेंडे, रमेश हेडाऊ, भैय्याजी निकुरे, तुळशीदास ठाकरे, संदीप हजारे, अशोक बोरकर, गुरुदास ठाकरे, किशोर गुरनुले, बाबाजी निकुरे, अविनाश निकुरे , गुरुदास गायकवाड, कारूजी मडावी, संतोष हेडाऊ, गोपाल गेडाम, नारायण आंबोरकर, शिवा उइके, मारोती फुलबांधे , वामन बावणे, मनोहर ढोक आदींनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये