बोगस बी बियाणे विक्री करणारा आरोपी पोलीसांच्या ताब्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन आर्वी जिल्हा वर्धा येथे दिनांक 27/05/2026 रोजी फिर्यादी नामे श्री संजय यादवराव बनमोटे वय 50 वर्षे, व्यवसाय नौकरी (कृषी अधिकारी तथा गुणनियंत्रण निरीक्षक) पंचायत समिती आर्वी जि. वर्धा यांनी तक्रार सादर केली कि, आरोपी नामे संजय मारोतराव गोपाळे, वय 52 वर्षे रा. शिरपुर बोके, ता. आर्वी जि. वर्धा याने बोगस बी बियाणे तयार करुन सदरचे बी बियाणे आपले गोडावुनवर साठवणुक केली आहे. अश्या तक्रारीवरुन पोलीस स्टेयन ला अपराध क्र. 303/2026 कलम 318(4), 3(5) भा.न्या.सं., सहकलम 7, 8, 9, 10, 11 बियाणे अधिनियम 1968, सहकलम 7 बियाणे कायदा 1966, सहकलम 3, 8, 9 बियाणे नियंत्रण आदेश 1983, सहकलम 3 कापुस बियाणे कायदा 2009 आणि अत्यावश्यक वस्तु कायदा 1955, सहकलम 7, 8, 9, 10, 15 पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्ह्याचे तपासात यातील नमुद आरोपी संजय मारोतराव गोपाळे, वय 52 वर्षे रा. शिरपुर बोके, ता. आर्वी जि. वर्धा यास त्याचे राहते घरुन ताब्यात घेवुन त्यास विश्वासात घेवुन सविस्तररित्या सखोल विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, त्याने सदरचे बी बियाणे हे पनम ऍग्रोटेक B/H Patel samaj AT Targhadi TA paddhari DIST- RAJKOT गुजरात येथिल कंपनी कडुन अनाधिकृतपणे HTBT कापुस बियाणे खरेदी केले तसेच त्या बियाणांची पॅकींग करणे व विक्री करण्याचे काम केले. आरोपी कडुन असा एकुन 29,46,846/- रु चा मुद्देमाल गुन्ह्यात पुराव्याकामी जप्त करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. चंद्रकांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन आर्वी ठाणेदार पोलीस निरीक्षक सतिष डेहनकर साहेब यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात पोउपनी संतोष चव्हाण, पो.हवा. दिंगांबर रुईकर, अकुश निचत, ऋषिकेश घंगारे, पो.अ. सुरजसिंग बावरी, सागर पाचोडे, सुरज रिठे, संजय बोकडे, बालाजी मस्के, प्रशांत नरबरीया यांनी केली. सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनात सुरु आहे.



