परमडोली बस सेवादासनगर-नोकेवाडा मार्गे सुरू
ग्रामस्थांनी मानले आमदार देवराव भोंगळे यांचे आभार
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- राजुराच्या एसटी बस आगारातून राजुरा ते परमडोली जाणारी बससेवा गेल्या काही महिन्यापासून सेवादासनगर-नोकेवाडा मार्गे बंद असल्याबाबतची माहिती ग्रा.पं.नोकेवाडा येथील सरपंच विमल राठोड, भाजयुमो.जिल्हाध्यक्ष महेश देवकते व भाजपा. तालुकाध्यक्ष दत्ता राठोड यांनी पञाद्वारे राजुरा विधानसभा क्षेञाचे आमदार देवराव भोंगळे यांना कळविले असता, आमदार देवराव भोंगळे यांच्या प्रयत्नाने ही बस सेवा पुनश्च: सुरू करण्यात आल्याने या परिसरातील ग्रामस्थांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. मागील काही महिन्यापासून राजुरा येथील एसटी आगाराची राजुरा ते परमडोली जाणारी बस सेवादासनगर-नोकेवाडा मार्गे सुरु नव्हती. बस वाहक व चालक यांनी सेवादासनगर-नोकेवाडा हा रस्ता खराब आहे, सदर मार्गे बस जावू-येवू शकत नाही, अशी चुकीची माहिती त्यांच्या वरिष्ठांना दिल्याने; मागील अनेक महिन्यापासून बस बंद करण्यात आली होती.
राजुरा ते परमडोली बस सेवादासनगर-नोकेवाडा मार्ग चुकवून, हटकरगुडा ते परमडोली जात-येत असल्याने व सेवादासनगर-नोकेवाडा मार्गे ये-जा करणारी बससेवा बंद झाल्याने या परिसरातील विद्यार्थी, रुग्ण यांच्यासह विविध कामानिमित्त जाणारे ग्रामस्थ, शेतकरी अशा अनेक लोकांना जिवती, चंद्रपूर येथे जातांना ञास सहन करावा लागत होता, त्यामूळे सेवादासनगर-नोकेवाडा बस सेवा सुरु होणे ग्रामस्थांच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाची होती. सेवादासनगर-नोकेवाडा जाणारी बस तात्काळ सुरु व्हावी; यासाठी राजुरा विधानसभेचे आमदार देवराव भोंगळे यांनी मागणीची दखल घेऊन व या परिसरातील ग्रामस्थांच्या मागणीकडे लक्ष वेधून राजूराचे आगार व्यवस्थापक राकेश बोधे यांच्याशी संपर्क साधून, राजूरा आगाराची राजुरा ते परमडोली जाणारी बस सेवा सेवादासनगर-नोकेवाडा मार्गे सुरु करण्याचे निर्देश देताच; आगार व्यवस्थापक, रागुरा यांचेकडून बस सेवा सुरु करण्यात आली. अनेक महिन्यापासून बंद असलेल्या बस सेवामुळे येणाऱ्या अडचणी दूर झाल्याने व ही बससेवा पूर्ववत्त सुरू झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी आमदार देवराव भोंगळे यांचे आभार मानले आहे.