न.प. कर्मचाऱ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळवण्यासाठी क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
देऊळगाव राजा नप चे कर्मचारी ठरले सुवर्ण पदकाचे मानकरी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महाराष्ट्र शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालय च्या वतीने गेल्या सहा वर्षापासून नप मधील कार्यरत कर्मचारी यांच्यासाठी त्यांचे अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलेले आहे त्यानुसार जिल्हास्तरीय, विभागीय स्तरीय, व राज्यस्तरीय अशा पद्धतीने खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत याचबरोबर त्यांच्या उत्साह वाढविण्यासाठी बक्षीसे व इतर पदक त्यांना देण्यात येणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदेमधील कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा बुलढाणा येथे दिनांक 11 डिसेंबर ते १३ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आल्या होत्या यामध्ये देऊळगावराजा नप च्या कर्मचाऱ्यांनी विविध खेळात बाजी मारत तीन सुवर्णपदक दोन रजत पदक दोन कास्य पदकासह कबड्डीचे जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे या सर्व विजेत्यांचा दिनांक 16 डिसेंबर रोजी नप चे मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी त्यांच्या कक्षात यथोचित सन्मान केला
नगरपरिषद प्रशासन संचलनालयाचे वतीने गेल्या सहा वर्षापासून नप मधील कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याची संबंधित विभागीय स्तरावरील व जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना आदेशित केले होते या मागचा त्यांचा उद्देश असा होता की न प तील अनेक कर्मचाऱ्यांच्या अंगी वेगळ्या कला दडून बसलेल्या आहेत त्यांना योग्य वेळी व्यासपीठ उपलब्ध होत नाही व दैनंदिन कामकाजाच्या व्यापातून तो कर्मचारी या कलागुणांना प्रगट करू शकत नाही त्यामुळे जिल्हास्तर, विभागीय स्तर, राज्यस्तरावर या कर्मचाऱ्यांना त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला दिनांक 11 डिसेंबर ते १३ डिसेंबर या कालावधीत बुलढाणा जिल्ह्यातील नगर विकास शाखेच्या वतीने क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते.
यामध्ये वैयक्तिक खेळ सांघिक खेळ मध्ये देऊळगाव राजा नप च्या कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला 200 मीटर धावणे मध्ये भोलेनाथ रसाळ यांनी सुवर्ण पदक लांब उडीमध्ये समाधान ढाकणे यांनी सुवर्णपदक तीन किलोमीटर चालणे विजय शिंगणे आणि रजत पदक लांब उडीमध्ये भोलेनाथ रसाळ यांनी रजत पदक वैयक्तिक गायन स्पर्धेत शब्बीर बेग इसाक बेग सुवर्णपदक, लांब उडीमध्ये कैलास बोबडे व महिलांमधून विजया शिंगणे यांनी कास्यपदक दक प्राप्त केले तर कबड्डी या सांघिक खेळात या टीमने जिल्हा स्तरावरील प्रथम बक्षीस प्राप्त केले कबड्डी टीम मध्ये जतीन नकवाल,कैलास बोबडे, हर्षल बोराडे, भगवान मापारी, आवेश पठाण, भोलेनाथ रसाळ, अशीश जायभाये, संदीप सुनगत, भाऊसाहेब साबळे, यांनी कामगिरी पार पाडली तर या सर्व खेळाडूंना न प चे गणेश मुळे अंकित बेलोकार, जतीन नकवाल, लेखापाल विश्वजीत गवते, श्रीकांत चिकले यांनी वेळोवेळी प्रोत्सहन देऊन सहाय्य केले.