Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

देवघाट येथे श्री दत्त जयंती उत्सवास आजपासून प्रारंभ

तीन दिवसीय यात्रा महोत्सव ; भजन स्पर्धा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

श्रीदत्त पौर्णिमेच्या निमित्ताने श्री दत्त जयंती तीन दिवसीय उत्सवाचे श्री दत्त मंदिर गणेशमोड, देवघाट नाला त.कोरपना येथे शनिवार दिनांक १४ पासून रविवार दिनांक १६ डिसेंबर पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. या निमित्य विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

शनिवार दिनांक १४ ला सकाळी सव्वा पाच वाजता समुदायिक ध्यान व लगेच आरती पूजापाठ,७.१५ वाजता ह भ प भुसारी महाराज यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना, सव्वा अकरा वाजता श्री दत्त यात्रेच्या उदघाटन, दुपारी सव्वा तीन वाजता भजन स्पर्धेचे उद्घाटन, रविवार दिनांक १५ सकाळी साडेपाच वाजता सामुदायिक ध्यान, आरती व पूजा पाठ, साडेदहा वाजता ह भ प मीनाथ महाराज यांचे प्रबोधन, सव्वा बारा वाजता ह भ प डाखरे महाराज यांचे जाहीर काल्याचे किर्तन व दहीहंडी काला स्वामी चैतन्य महाराज वढा यांचे शुभ हस्ते, सोमवार दिनांक १६ सकाळी साडेपाच वाजता सामूदायीक ध्यान, आरती व पूजापाठ, सव्वा अकरा वाजता ह भ प तुकाराम जाधव महाराज, ह भ प गुरनुले महाराज, ह भ प किनाके महाराज, ह भ प चौधरी महाराज , ह भ प मिंनाथ महारा, ह भ प भेंडाले महाराज यांचे प्रबोधनपर कीर्तन, सव्वा सात वाजता समुदायिक प्रार्थना याप्रमाणे कार्यक्रमाची रूपरेषा राहणार आहे.

तरी होऊ घातलेल्या श्रीदत्त जयंती उत्सवात जास्तीत जास्त भाविक भक्तांनी सहभाग घ्यावा असे आवाहन श्रीदत्त मंदिर संस्थान गणेशमोड यांचे तर्फे करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये