Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

परभणी येथील समाजकंटकावर कारवाई करा

भीम आर्मी भद्रावतीची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

   परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरासमोरील दर्शनी भागात असलेल्या भारतीय संविधान प्रतिकृतीची १० डिसेंबर रोजी एका समाजकंटकाकडून विटंबना करण्यात आली. या विरोधात 11 डिसेंबर रोजी काढण्यात आलेल्या निषेध मोर्चाला हिंसक वळण प्राप्त झाले. विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करून बौद्ध अनुयायांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत भद्रावती येथील भीम आर्मी संघटनेतर्फे तहसीलदारांना शुक्रवारी निवेदन देण्यात आले.

विटंबनीच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता. मात्र आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाल्याने पोलीस प्रशासनाने कोंबिंग ऑपरेशन राबवून बौद्ध अनुयायांवर गुन्हे दाखल केले आहेत. दाखल केलेले गुन्हे ताबडतोब मागे घेण्यात यावे तसेच समाजकंटकावर कारवाई करावी यांसह इतर मागण्यांसाठी भद्रावती येथील भीम आर्मी भारत एकता मिशन तर्फे तहसीलदारांच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी माझी महाराष्ट्र महासचिव शंकर मून, भीम आर्मी तालुका अध्यक्ष राजरतन पेटकर, शहराध्यक्ष थॉमस दुधे, शहर उपाध्यक्ष मिलिंद रामटेके, करण सोंडवले, प्रणय कांबळे, सोनू सिंग, स्वप्नील बनकर, कृत्तांत सहारे, अतुल पाटील यांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये