Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

चिरादेवी येथे 21 वर्षीय युवतीची गळफास लावून आत्महत्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

शिक्षण घेत असलेल्या एका 21 वर्षीय युवतीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.सदर घटना दिनांक 10 रोज मंगळवारला सायंकाळी साडेपाच वाजता तालुक्यातील चिरादेवी या गावात घडली. सदर साक्षी पांडुरंग मोंढे, वय, 21 वर्षे राहणार, चिरादेवी असे या मृतक युवतीचे नाव आहे.

सदर मृतक युवतीने घरी कोणीही नसताना आपल्या राहत्या घरातच स्लैबला असलेल्या लोखंडी हुकाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला व मर्ग दाखल केला. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये