Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

वंचित बहुजन आघाडी तर्फे भद्रावतीत ईव्हीएम मशीन विरोधात स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

    वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी इव्हिएम मशीन विरोधात राज्यभर स्वाक्षरी मोहीम चालविण्याची हाक दिल्यानंतर भद्रावती शहर तथा तालुका वंचित बहुजन आघाडी तर्फे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दिनांक 7 पासून इव्हीएम मशीन विरोधात स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. सदर स्वाक्षरी मोहीम दिनांक 16 डिसेंबर पर्यंत चालणार आहे.

मोहिमेच्या पहिल्याच दिवशी अनेक नागरिकांनी या मोहिमेला प्रतिसाद देत ईव्हीएम मशीनच्या विरोधात स्वाक्षऱ्या केल्या. सदर मोहिमेत वंचित आघाडीचे प्रदेश सदस्य कुशल मेश्राम, तालुका अध्यक्ष विशाल कांबळे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष संध्याताई पेटकर, सुनील खोब्रागडे, प्रकाश पेटकर, देवेंद्र वानखेडे, सुमेध घुटके, राखीताई रामटेके, सीमाताई ढेंगळे, वैशालीताई चिमुरकर, लताताई टिपले आदी सहभागी झाले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये