Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी बँक खाते आधार कार्ड शी संलग्न करावे – तहसिलदार वैशाली डोंगरजाळ 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

महसुल विभागाच्या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य ऑक्टोंबर महिन्यापासून डी बी टी प्रणाली द्वारे करण्यात येणार आहे. श्रावण बाळ, संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी विधवा, दिव्यांग, वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी डी बी टी प्रणाली द्वारे अर्थसहाय्य प्राप्त करून घेण्यासाठी लाभार्थी यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आवाहन तहसिलदार वैशाली डोंगरजाळ यांनी केले आहे.

लाभार्थी यांनी त्यांचे आधार कार्ड व बँक पास बुक तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेच्या शाखेत किंवा संबंधीत गावचे तलाठी, किंवा कोतवाल यांच्या कडे जमा करावे, यापूर्वी जमा केले असल्यास जमा करण्याची आवश्यकता नाही.

लाभार्थी यांनी आधार सेवा केंद्राद्वारे आपले आधार कार्ड अपडेट असल्याची खात्री करून घ्यावी, लाभार्थी यांना डी बी टी प्रणाली द्वारे अर्थसहाय्य प्राप्त करून घेण्यासाठी लाभार्थी यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे याची खात्री बँकेत जाऊन करावी असे आवाहन तहसिलदार वैशाली डोंगरजाळ यांनी केले आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये