ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून विक्रमी रक्तदान

१४ शिबिरांत १,०७० रक्तदात्यांचा सहभाग

चांदा ब्लास्ट 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह उत्साहात राबविण्यात येत आहे. १५ जुलैपासून सुरू झालेल्या या सेवा सप्ताहांतर्गत विविध सामाजिक, आरोग्य व जनकल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, मतदारसंघातील ५६ ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मळित असून, रविवारी आयोजित करण्यात आलेल्या १४ रक्तदान शिबिरांमध्ये विक्रमी रक्तदान झाले असून तब्बल १ हजार ७० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला.
रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्ताचा तुटवडा भासू नये, या उद्देशाने आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून सेवा सप्ताहात मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध संस्थांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवित रक्तदान केले.
रविवारी पाताळेश्वर मंदिर परिसर, भिवापूर, गुरुद्वारा, स्वातंर्त्यवीर सावरकर सभागृह, वडगाव, घुग्घूस, विठ्ठल मंदिर वॉर्ड तसेच इतर विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे पार पडली. प्रत्येक केंद्रावर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान केले, त्यामुळे सर्वच शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
आमदार किशोर जोरगेवार यांनी विविध शिबिरांना भेट देत रक्तदात्यांचे अभिनंदन केले. समाजासाठी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी सांगितले की, एका रक्तदात्यामुळे अनेक रुग्णांना नवजीवन मळिू शकते. समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी ओळखून नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होणे ही आनंदाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
१५ ते २३ जुलैदरम्यान सुरू असलेल्या देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह रक्तदान शिबिरांसह महाआरोग्य शिबिरे, योग शिबिरे, वृक्षारोपण, धार्मिक कार्यक्रम, दिव्यांग बांधवांना साहित्य वितरण, गुणवंत व उत्कृष्ट खेळाडूंचा सत्कार तसेच विविध जनकल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व उपक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये