देऊळगाव राजा येथे जागतीक महिला दिन साजरा
कर्तबगार महिलांचा केला सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जनसेवा सामाजिक संघटना, तालुका सेवानिवृत्त संघ, व पत्रकार संघ यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला.
शासकिय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार प्रा विनायक कुलकर्णी होते, या कार्यक्रमांत सौ नंदा रविंद्र इंगळे,सौ. मंगल संजय भाग्यवंत,पत्रकार सुषमा राऊत, पूजा कायंदे, किरण वाघ, लक्ष्मी गिरे, मेघा जाधव, भिकुबाई शिवाजी मांटे, आम्रपाली खरात, गायिका प्रीत पाटील यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुषपगुच्छ व भेटवस्तु देउन गौरविण्यात आले,
याप्रसंगी जेष्ठ पत्रकार प्रा विनायक कुलकर्णी व सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रकाश खांडेभराड यांनी महिला दिनी महिलांच्या कार्याचा गौरव केला, पत्रकार सुषमा राऊत यांनी महिलांचा गौरव केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले, याप्रसंगी गायिका प्रीत पाटील यांनी सुमधुर आवाजात मराठी गाणे सादर केले.
कार्यक्रमांत प्रा अशोक डोईफोडे,बंडू भाऊ झोरे, मुन्ना ठाकूर, महम्मद शेख, अश्रफ पटेल, विजय जाधव, दयासिंग बावरे, रवि इंगळे, दिनकर जाधव, नितीन गीरे, माया खरात उपस्थित होते. या कार्यक्रमांचे आयोजन पत्रकार मुन्ना ठाकूर, महम्मद शेख, किरण वाघ यांनी केले होते,
कार्यक्रमांचे संचालन प्रा अशोक डोईफोडे यांनी केले तर आभारप्रदर्शन किरण वाघ यांनी केले.