जिवती पोलीस स्टेशन अंतर्गत दोन घरफोडींना तडकाफडकी अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जिवती पोलीस स्टेशन अंतर्गत दोन प्रकरणांतील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून पोलिसांनी अज्ञात आरोपीची ओळख करुन त्याला ताब्यात घेतले आहे. ही दोन्ही प्रकरणे जिवती पोलीस स्टेशन अंतर्गत देवलागुडा आणि शांतीनगर याठिकाणी घडली होती. या प्रकरणात एक १७ वर्षांच्या विधीसंघर्षग्रस्त बालकाला संशयावरून ताब्यात घेऊन त्याने दोन्ही घरफोडी केल्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून चोरलेला माल जप्त करण्यात आला.
: देवलागुडा येथील घरफोडी
दिनांक ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी देवलागुडा येथील फिर्यादी श्रीमती शामकाबाई राजेश चक्षाण यांनी पोलिसांना तक्रार दिली की त्यांच्या घरातून अज्ञात आरोपीने स्वतःस अन्याय्य फायदा व त्यांना तोटा पोहोचविण्याच्या उद्देशाने रुपये २०,०००/- नगद आणि १२ तोळे चांदीचे दागिने (५,०००/- रुपयांचे) चोरले आहेत. या दोन्ही प्रकरणी फिर्याद्यांनी केलेल्या तोंडी रिपोर्टवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
शांतीनगर येथील घरफोडी
दिनांक १४ मार्च २०२५ ते १५ मार्च २०२५ या दरम्यान शांतीनगर येथील फिर्यादी रमेश नारायण जाधव यांच्या घरातून रुपये ५२,०००/- नगद आणि दोन ५ ग्रॅम प्रत्येकीच्या सोन्याच्या अंगठ्या (किंमत १,५०,०००/- रुपये) चोरल्याची तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणातही पोलिसांनी तोंडी रिपोर्टवरून गुन्हा दाखल केला आहे.
मा. पोलीस अधीक्षक श्री. मुम्गका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रिना जनबंधू आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले.
या पथकाने संशयावरून एका १७ वर्षांच्या बालकाला ताब्यात घेतले आणि त्याच्या विचारपूसीनंतर दोन्ही घरफोडींचा गुन्हा कबुल करण्यात आला. बालकाकडून चोरलेला माल जप्त करण्यात आला आहे. पोलीस पथकात पोउपनि निलेश पाळीया, पो जगदिश मुंढे, ज्ञानेश्वर ढोकळे, किरण बाठोरे व इतर अधिकारी होते.