ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विकास कामांची गंगोत्री घरोघरी पोहोचविण्यासाठी अविरत कार्य करणार

उद्योजक तथा माजी नगरसेवक गौरव भैय्या 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

       भारतीय जनता पक्षाची विचारधारा मला पटल्यामुळे व ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाकरिता कार्य करण्यासाठी मी भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश केला. भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश करण्यासंदर्भात माझा कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नाही, म्हणूनच मी पक्षाला कुठलेही पद मागितले नाही एक सर्वसामान्य माणूस म्हणूनच मी कार्य करणार आहे. ब्रह्मपुरीतील जनतेच्या विकासासाठी मी हा पक्षप्रवेश केलेला आहे. ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकासासाठी मी सर्वतोपरी कार्य करेल व विकास कामांची गंगोत्री घराघरा पर्यंत पोहोचविण्यासाठी कार्य करेल असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक तथा माजी नगरसेवक गौरव भैया यांनी केले. युवा मंच व गौरव भैया मित्र परिवार यांच्या वतीने शुक्रवारला कृष्ण सेलिब्रेशन हॉल सभागृहात आयोजित केलेल्या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी जि. प. उपाध्यक्ष कृष्णा सहारे हे होते. प्रसंगी उद्योजक अजय भट्टड, उद्योजक निलेश मोहता, अविनाश राऊत, माजी नगरसेवक सतीश हुमने आदी मान्यवर व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते. प्रसंगी युवा मंच व मित्रपरिवार, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, सिद्धेश भर्रे मित्रपरिवार, सोनार समाज, विद्यानगर वार्ड, कुर्झा वार्ड, बोंडेगाव वार्ड मित्र मंडळ यांच्या वतीने उद्योजक तथा माजी नगरसेवक गौरव भैया यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

 गौरवजी भैया पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाची विचारधारा हे सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी कार्य करणारी विचारधारा आहे. प्रजा हित जोपासणारी ही विचारधारा आहे. भारतीय जनता पक्षाची विचारधारा मला पटल्यामुळे व ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाकरिता कार्य करण्यासाठी मी भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,आमचे बंधू चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भाऊ भांगडिया, माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या नेतृत्वात मुंबई येथे पक्ष प्रवेश केला. पक्षाची विचारधारा तळागळात पोहोचविण्यासाठी मी तन,मन आणि धनाने सर्वतोपरी मदत करणार आहे. केवळ ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्येय आहे. इतर विधानसभा क्षेत्राचा विकास बघता, ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र अजूनही मागासलेला आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात अद्यापही रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. ब्रह्मपुरी तालुक्यात एमआयडीसी नाही त्यामुळे आपला विधानसभा क्षेत्र मागासलेला आहे. ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकासाकरिता चांगले कार्य माझ्या हातून करता येतील ते मी करेल व पर्यायाने विधानसभा क्षेत्राचा विकास घडवून आणण्यास मदत करेल.

प्रसंगी अविनाश राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त करून गौरव भैया यांना शुभेच्छा दिल्या. कृष्णा सहारे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात म्हटले की, गौरव भैय्या यांना वार्ड, शहर, तालुक्याची व पर्यायाने विधानसभा क्षेत्राची सेवा करण्याची संधी लाभली. त्यामुळे विकासाची गंगा घरोघरी आणण्याच्या दृष्टीने हे निश्चितच आनंदाची बाब आहे. भारतीय जनता पक्षात काम करणारा माणूस मोठा होतो. सर्वसामान्य तळागळातील कार्य करणारा माणूस या पक्षात मोठा झालेला आहे. गौरव भैया यांच्या पक्षप्रवेशाने निश्चितच संघटन शक्ती वाढून भारतीय जनता पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी मदत होईल. ज्याप्रमाणे गौरव भैया व्यवसायात यशस्वी झालेत त्याचप्रमाणे पक्षात काम करून उंची गाठून यशस्वी व्हावे, अशा शुभेच्छा कृष्णा सहारे यांनी प्रदान केल्या.

कार्यक्रमाचे संचालन, प्रस्ताविक व आभार युवा मंच तथा गौरव भैया मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये