Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

अमरदीप लोखंडे युवा आयकॉन महाराष्ट्र “समाज रत्न भूषण” पुरस्काराने सन्मानीत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रह्मपुरी तालुक्यातील अ-हेर नवरगांव येथील रहिवासी कवी,पत्रकार, सामाजिक,शैक्षणिक, वृक्षारोपणासारखे कार्य करून वृक्षांचे संगोपन करून मोठे करणारे अमरदीप लोखंडे यांचा पुणे येथील तळेगाव दाभाडे नाना – नानी पार्क सौ. पुष्पावती दशरथ बहुले सभागृह येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात युवा महाराष्ट्र भूषण आयकाॅन “समाज रत्न “पुरस्कार उद्घाटक डॉ अमरजी चौरे संस्थापक अध्यक्ष माय रमाई फाउंडेशन पुणे, प्रसिद्ध चित्रपट अभिनेता, टीव्ही सिरीयल न्यू होम मिनिस्टर अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर मुंबई, गौतमी पाटील लावण्यवती लावणी फेमस, अभिनेत्री आरोही हिवरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन सूर्यवंशी डायरेक्टर ईशान्य ग्रुप कंपनी, मुंबई,प्रसिद्ध साहित्यिक देविदास रौराळे अमरावती, प्रमुख मार्गदर्शक शिवव्याख्याते हरीश भाऊ देखणे पुणे,बक्षीस वितरकत संजय कुलकर्णी तळेगाव दाभाडे, सागर भाऊ रितेश वाघमारे यांनी सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले.

युवा आयकॉन महाराष्ट्र भूषण “समाज रत्न “पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरातून, मित्रपरिवार यांनी अमरदीप लोखंडे यांचे अभिनंदन, कौतुक व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये