सिंदखेड राजा मतदार संघामध्ये प्रस्थापितांना धक्का देत महायुती चे युवा नेते मनोज कायंदे यांची विजयी सलामी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
सिंदखेड राजा मतदार संघामध्ये झालेल्या अतिशय चुरशीच्या लढतीत प्रस्थापितांना धक्का देत महायुती चे अधिकृत उमेदवार मनोज कायंदे यांनी विजयी सलामी देत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ राजेंद्र शिंगणे यांचा 4650 मतांनी पराभव केला.
सिंदखेड राजा मतदार संघामध्ये महायुती मध्ये मैत्रीपूर्ण लढत होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने युवा नेते मनोज कायंदे यांना उमेदवारी दिली तर शिवसेना ने माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांना उमेदवारी दिली, महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष तर्फे डॉ राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी दिली, तिरंगी लढत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, डॉ राजेंद्र शिंगणे व डॉ शशिकांत खेडेकर यांची कारकीर्द मतदारांनी अनुभवली होती, मतदार संघामध्ये परिवर्तन होणे गरजेचे आहे असे मतदारांना वाटत होते, एक नवीन युवा नेते मनोज कायंदे यांना यावेळी संधी देण्यासाठी विजयी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषी मंत्री धनंजय मुंढे, छगन भुजबळ, अमोल मिटकरी यांनी मतदारांना मनोज कायंदे यांना विजयी करण्याचे भावनिक आवाहन केले होते आवाहन केले होते.
दरम्यान मनोज जरांगे यांनी ओबीसी विरोधात केलेल्या वक्तव्यावर ओबीसी समाज व वंचित बहुजन समाज मोठया प्रमाणावर मनोज कायंदे यांच्या पाठीशी उभा राहिला,
वंजारी समाजाचे सुद्धा मोठ्या संख्येने पाठबळ मिळाले हे विसरता येणार नाही.
आज सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली तेव्हा सुरवातीला डॉ राजेंद्र शिंगणे व डॉ शशिकांत खेडेकर यांनी आघाडी घेतली होती , मात्र अकराव्या फेरी पासुन मनोज कायंदे यांनी आघाडी घेतली ती अखेरपर्यंत कायम राहिली आणि विजयश्री खेचून आणली. मनोज कायंदे यांना 73,413 डॉ राजेंद्र शिंगणे यांना 68,763 तर डॉ शशिकांत खेडेकर यांना 60635 मते पडली.
4952 मताने मनोज कायंदे विजयी झाले.
विजयी झाल्याचे कळताच देऊळगाव राजा येथे बस स्थानक चौकात, भगवान बाबा नगर चौक, तसेच अन्य भागात कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून, आतिषबाजी करीत जल्लोष केला.