ताज्या घडामोडी

पोलिसांची नाकाबंदी करून सापळा रचून प्रो.रेड कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

            पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे दिनांक 17/11/2024 रोजी पोस्टे परिसरात विधानसभा निवडणूक संबंधाने पोलीस ठाणे परिसरात मा. वरिष्ठांच्या आदेशाने कोंबिग ऑपरेशन राबवित असताना संत चोखोबा वार्ड हिंगणघाट येथे राहणारा आकाश उर्फ लला धनराज शिंदे हा त्याचे ताब्यातील चारचाकी वाहनाने देशी दारूचा माल घेऊन नंदुरी रोड ने हिंगणघाट कडे वाहतूक करून घेऊन येत आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहीती मा.ठाणेदार मनोज गभने सा. यांना देवून त्यांचे आदेशाने मौजा कलाजना येथे पोस्टाँप सह रवाना होवून मिळालेल्या माहीती प्रमाणे नाकाबंदी करून सापळा रचून प्रो.रेड कार्यवाही केली असता त्याचे ताब्यात चारचाकी स्विफ्ट VDI सिल्वर रंगाची गाडी क्र mh 31 CS 4688 कीं 250000 चे डीकिमध्ये पाहणी केली असता देशी दारूचे 07 बॉक्स मधे 700 बॉटल्स कीं 70000/- रू. असा जु कीं 3,20,000/-रू चा माल जप्त करून त्याचे विरूध्द पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

ही संपूर्ण कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक अनुराग जैन साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक डाँ. सागर कुमार कवडे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत सा. यांचे निर्देशानुसार मा.मनोज गभने, पोलीस निरीक्षक सा. हिंगणघाट यांचे आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील सपोनि आळंदे डि.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना. राहुल साठे, पोना विवेक वाकडे,पो.शी मंगेश वाघमारे पोशी आशिष नेवारे,पो.शि. विजय काळे यांनी केली. सदर गुन्हयांचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये