ताज्या घडामोडी

पोलिसांची अवैध दारू वाहतुकीवर प्रो.रेड कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

            पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे दिनांक 17/11/2024 रोजी पोस्टे परिसरात विधानसभा निवडणूक संबंधाने पोलीस ठाणे परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गौतम वॉर्ड हिंगणघाट येथे राहणारा अजय पांडुरंग खंदार हा त्याचे ताब्यातील मोटार सायकलनी दारू माल घेऊन दाभा रोडने काळी सडक रोड हिंगणघाट कडे वाहतूक करून घेऊन येत आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहीती मा.ठाणेदार मनोज गभने सा. यांना देवून त्यांचे आदेशाने काळी सडक मार्केट यार्ड हिंगणघाट येथे पोस्टाँप सह रवाना होवून मिळालेल्या माहीती प्रमाणे नाकाबंदी करून सापळा रचून प्रो.रेड कार्यवाही केली असता त्याचे ताब्यात 1)होंडा ट्विस्टर मोटर सायकल क्र mh 31 A 9911कीं 40,000/-रू 2) डिक्कीवरील बॅगमध्ये रायल स्टॅग कंपनीचे 02 लिटरचे 05 प्लास्टिकचे बंपर कीं 15000/-रू. असा जु कीं 55,000/-रू चा माल जप्त करून आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

ही संपूर्ण कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक अनुराग जैन साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक डाँ. सागर कुमार कवडे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत सा. यांचे निर्देशानुसार मा.मनोज गभने, पोलीस निरीक्षक सा. हिंगणघाट यांचे आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील सपोनि आळंदे डि.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना. राहुल साठे, पोना विवेक वाकडे,पो.शी मंगेश वाघमारे पोशी आशिष नेवारे,पो.शि. विजय काळे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये