ताज्या घडामोडी

ट्रकसह रेती असा 10 लाख 25 हजाराचा माल हस्तगत

02 आरोपी विरुद्ध कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दि. 16/11/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेची पथके पेट्रोलिंग करीत असतांना धाम नदीचे पात्रातून मौजा तरोडा गावाचे शिवारातून ओली रेती चे उत्खनन करून मजुराचे साह्याने ट्रक मध्ये भरून तिची अवैधरीत्या चोरटी वाहतूक होत आहे अशा गोपनीय माहितीच्या आधारे नाकेबंदी करून ट्रक क्रं एम. एच. 32 क्यु 1714 चे चालक याला थांबाऊन विचारणा केली असता ट्रकमालक नौशाद खान रा. फुलफैल, आंनदनगर, वर्धा (पसार याचे सांगण्यावरुन ट्रकचालक अनिल महादेव धोंडे, वय 55 वर्ष, रा. सांवगी मेघे, वार्ड न. 02. वर्धा, याने त्याचे ताब्यातील एक जुना वापरता ट्रक टाटा कंपनीचा लाल पांढरा रंगाचे कॅबीन व हिरव्या रंगाचे डाले असलेला ज्याचा नोंदणी क्रमांक एम. एच. 32 क्यु 1714 असा असुन 2)ट्रकचे डाल्यात अंदाजे अडीच ब्रास ओली रेती (250 फुट) किंमत प्रती ब्रास 10,000 रू प्रमाणे किंमत 25,000 रूपये असा एकूण किंमत 10,25,000 रू चां माल चोरीची काळी ओली रेतीची वाहतूक करताना मिळून आला चालक याचे ताब्यातून ट्रक व चोरीची माल मिळाल्याने तो जागीच जप्त करण्यात आला. पो स्टे सेवाग्राम येथे दोन्हीं आरोपी विरुध्द कलम 303(2), 3(5) भारतीय न्याय संहिता 2023 कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आले आहे.

  सदर कारवाई मा. श्री अनुराग जैन साहेब, पोलीस अधीक्षक वर्धा, मा. श्री. सागर कवडे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस अमलदार गजानन लामसे, चंद्रकांत बुरंगे, भूषण नीघोट, रितेश शर्मा, मनीष कांबळे, अमोल नगराळे, गोपाल बावनकर, मंगेश आदे, दीपक साठे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली..

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये