ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा शहरातील आदर्श कॉलनीत राहणाऱ्या 22 वर्षीय महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 26 ला दुपारी दीडच्या दरम्यान घडली शहरातील आदर्श कॉलनी येथे मृतक युवक सुहास संतोष रांधवन वय 22 वर्ष राहत होता महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या युवकाने त्याचे राहते घरी असताना आई वडील शेगाव येथे गेलेले असलेले पाहून राहत्या घरी सिलिंग फॅनला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 26 ला दुपारी घडली.

याप्रकरणी गजानन आसाराम गायकवाड राहणार भगवान बाबा नगर यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली त्यावरून मर्ग दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल नायब राव मोगल करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये