बाळाचे आयुष्यातील सुरवातीचे हजार दिवस अत्यंत महत्त्वाचे
पि डी सुदामे युनिसेफ सल्लागार यांची माहिती
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
राष्ट्रीय आरोग्य अभियान याचे प्रमुख उद्दिष्ट असलेले माता मृत्यू व बालमृत्यू रोखण्यासाठी तसेच माता व बाल कुपोषण कमी करण्यासाठी कोरपना व जिवती तालुक्याच्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे उपरवाही येथील अंबुजा सिमेंट फाउंडेशनच्या सभागृहात मध्ये शनिवार दिनाक १० जून रोजी स्तनपान व शिषु पोषण बाबत मार्गदर्शन घेण्यात आले सदर मार्गदर्शक कार्यशाळेला युनिसेफचे सल्लागार पि डी सुदामे ,स्तनपान व शिशु पोषण मास्टर ट्रेनर डॉ. किशोर भट्टाचार्य व कोरपना व जिवति तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ स्वप्नील टेंभे यांनी मार्गदर्शन केले.
कोरपना व जिवति तालुक्यातील अनेक आदिवासी बहुल गावांमध्ये आजही पोषणाच्या बाबतीत अनेक चुकीच्या रूढी कल्पना विस्तारलेल्या आहेत त्यावर योग्य उपाय काढण्याची गरज असल्याचे प्रतिपादन श्री सुदामे यांनी केले याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की,
बाळाच्या आयुष्यातील पहिले हजार दिवस खूप महत्त्वाचे असतात यामध्ये गरोदर मातांचे पोषण सुद्धा अंतर्भूत आहेत प्रसूतीनंतर पहिल्या पाच मिनिटांत बाळाचा स्पर्श व पहिल्या एका तासात स्तनपानास सुरुवात केल्यास पहिल्या दिवशी होणारे अर्भक मृत्यूचे प्रमाण हे खूप कमी होऊ शकते. स्तनपान व योग्य शीशु पोषण याने जवळजवळ 20 टक्के बालमृत्यू आपण थांबू शकतो.
सहा महिन्यानंतर बाळाला वरचा आहार सुरू करणे ही काळाची गरज असून प्रत्येक कुटुंबाने बाळाला पुरक पोषक अन्न दिल्यास कुपोषणाचे प्रमाण आपण खूप कमी करू शकतो त्याकरिता गावागावात माता बाल कुपोषण निर्मूलन समिती स्थापन करून त्यांना योग्य शिक्षण देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ किशोर भट्टाचार्य यांनी केले.
पोषण ही एक सामाजिक चळवळ व्हावी व त्यातून सुदृढ समाज निर्माण व्हावा त्याकरिता सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपले सर्व कश प्रयत्न करावे असे आवाहन डॉ . स्वप्नील टेंभे यांनी सदर कार्यक्रमात केले.
अंबुजा सिमेंट फौंडडेशन आरोग्य समन्वयक श्री जितेंद्र बैस यांनी तालुक्यातील सर्व गावांमध्ये कुपोषण मुक्ती साठी अंबुजा सिमेंट फाउंडेशन तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याबाबत ची माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रमात अंबुजा सिमेंट फाउंडेशनच्या सौ. कल्पनाताई कोरपणा व जिवती तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी हजार होते.