ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

करण देवतळे यांना उमेदवारी देऊन भाजपने खेळली मोठी खेळी

अखेर भाजपने आपला हिडिंग गेम साधला : विरोधकांपुढे तगडे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       भद्रावती – वरोरा विधानसभा क्षेत्रात अखेर भाजपने आपला हिडिंग गेम साधला असुन मेश राजुरकर यांचे नाव चर्चेत ठेवून आयत्यावेळी करण देवतळे यांना महायुतीची उमेदवारी घोषित करून या निवडणूक रिंगणात मोठी खेळी खेळत सध्या तरी सरशी साधली आहे. आता महाविकास आघाडीचा उमेदवार नेमका कोण असेल यावर भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्रातील लढत कशी होईल हे ठरणार आहे. करण देवतळे यांची उमेदवारी अनेकांना अनपेक्षित वाटत असेल मात्र ही उमेदवारी अनपेक्षित नव्हे तर अपेक्षित अशीच होती. रमेश राजुरकर यांचे नाव उमेदवारी साठी एकीकडे चर्चेत असताना दुसरीकडे करण देवतळे यांना उमेदवारी देण्याबाबत भाजपचे गेल्या कित्येक दिवसांपासून गुप्त खलबते सुरू होती.

भाजपचे कार्यकर्ते सुद्धा करण देवतळे यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही होते. येथे दुसरी महत्त्वाची बाब अशी की रमेश राजुरकर हे उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे नेट लावून होते. तर दुसरीकडे उमेदवारीची कोणतीही अभिलाषा नसताना करण देवतळे यांच्याकडे स्वतः उमेदवारी चालून आली हे येथे उल्लेखनीय अशी बाब आहे. करण देवतळे यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी स्वयं प्रेरणेने फटाके फोडून जल्लोष व्यक्त केला ही बाब निवडणुकीत भाजप कार्यकर्ते एक संघ असल्याची जाणीव करून देते.ही बाब भाजपसाठी अत्यंत लाभदायक म्हणावी लागेल.

देवतळे कुटुंबाचे भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्रातील राजकारणात मोठे वर्चस्व असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. हे घराणे राजकारणात अजूनही वलयंकित घराणे असून त्यांचे या क्षेत्रात स्वतःचे असे वर्चस्व असल्याची बाब स्वर्गीय संजय देवतळे हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्यावरही लक्षात आली होती. अद्यापही या घराण्याची राजकीय जादू क्षेत्रात कायम आहे. येत्या निवडणुकीत ते दिसुनही येईल. वडिलांप्रमाणेच सभ्य,सोज्वळ,प्रमाणीक व नम्रता करण देवतळे यांच्यामध्येही दिसुन येते. अलीकडच्या राजकारणात अशी प्रतिमा असलेली माणसे मिळणे कठीण आहे. एक मात्र खरे की करण देवतळे यांच्या रूपाने भाजपने एक सशक्त उमेदवार दिला असुन विरोधकांसमोर निवडणुकीच्या पहिल्या चरणातच तगडे आव्हान उभे केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये