ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विधानसभा निवडणुकीच्या पूर्व संधेवर पवनार येथील सराईत असलेले दोन अवैद्य दारू विक्रेते केले यांना केले हद्दपार

सेवाग्राम पोलिसांची कामगिरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पवनार इथे गेल्या अनेक वर्षापासून गावठी दारू विक्रीला मोठ्या प्रमाणात उधाण आले होते वारंवार पोलीस प्रशासन कडून सूचना दिवूनही दारू विक्री सुरू असल्याने सपना डफ यांना तीन महिने तर अनिल नगराळे यांना दोन महिन्या करीता जिल्ह्यातून शनिवार रोजी सेवाग्राम पोलीस प्रशासना कडून हद्दपार करण्यात आले पवनार इथे मोठ्या प्रमाणात गावठी दारू तसेच विदेशी दारूची विक्री होत होती दारू विक्रेत्यांनी दारू विक्री बंद करावी या करीता पोलीस प्रशासना कडून ग्रामपंचायत भवन इथे सभा घेत सेवाग्राम पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनीत घागे यांच्या कडून सक्त ताकीद देण्यात आली होती गावातील सपना डफ अनिल नगराळे व इतर जणांना सेवाग्राम पोलीस पोलीस निरीक्षक यांनी तंबी दिली असूनही गावातील अनिल नगराळे व सपना डफ यांचे कडून अवैद्य धंदे सुरू होते.

त्यामुळे गावातील शांतता भंग होऊन कायद्याचा हिरमोड होत होता या मुळे आज शनिवार रोज यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले असून नागपूर जिल्ह्यातील हिंगणा या ठिकाणी नागपूर यांचे अभिलेखावर घेऊन गुन्हे प्रकटीकरण पथक हिंगणा यांनी त्यांच्या नातेवाईकाकडे सुपूर्द केले असल्याची माहिती दारू बंदी पथक यांच्या कडून हि माहिती देण्यात आली असून सदर कारवाई पोलीस हवालदार हरिभाऊ ककड गजानन कठाने अभय इंगळे संजय लाडे वैष्णवी भोयर प्रदीप कुचंनकर यांच्या कडून ही कारवाई सेवाग्राम ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनीत घागे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

     या मुळे पवनार ग्रामस्थांकडून सेवाग्राम पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त केले जात आहे तसेच इतर दारू विक्रेत्यांना हि अशीच कारवाई करून जिल्ह्यातून कायम स्वरुपी हद्दपार करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये