ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एनसीसी छात्र सैनिकांचा ‘पर्यावरण पूरक दिवाळी’चा संदेश प्रेरणादायी – प्राचार्या डॉ. सोनारे 

हस्तकला अंतर्गत दिवाळीचा आकाश दिवा, ग्रीटिंग्स, दिवे व पोस्टर्स

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

देवळी: ‘आज पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात -हास होताना आपण पाहत आहे. दिवाळीचे फटाके मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण करतात अशावेळी सुजाण नागरिकांनी पुढे येऊन प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याकरिता पुढाकार घेतला पाहिजे या दृष्टिकोनातून एनसीसी छात्र सैनिक व रासेयो स्वयंसेवकांनी दिलेला पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करा हा संदेश प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सुनिता सोनारे यांनी एनसीसी कार्यालय परिसरात आयोजित कार्यक्रमात 28 ऑक्टोबर रोजी दिला.

21 महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या अंतर्गत स्थानिक एस एस एन जे महाविद्यालयातील एनसीसी छात्र सैनिक, रोव्हर्स रेंजर्स व राष्ट्रीय सेवा योजना च्या स्वयंसेवकांनी दिवाळी पर्वावर हस्तकला या विषयांतर्गत दिवाळी करिता आकाश दिवे, दिव्यांची सजावट, ग्रीटिंग्स, पर्यावरण पूरक फटाके व पर्यावरण वाचवा दर्शविणारे पोस्टर्स तयार करून पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करूया असा संदेश दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर सोनारे तर प्रमुख अतिथी म्हणून एनसीसी अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर, प्रा. मेघा फासगे व प्रा. डॉ. नीलिमा बर्गट उपस्थित होते.

दिवाळी पर्वावर एनसीसी छात्र सैनिकांनी टाकाऊ वस्तु पासून आकाशदिवे, ग्रीटिंग्स, दिव्यांची सजावट, तोरण व फटाके मुक्त दिवाळीचा संदेश देणारे पोस्टर्स तयार केले. यात कोमल शितोळे, वैष्णवी कन्नाके, अनुश्री खंडारे व एनसीसी छात्र सैनिक यांनी सक्रियपणे सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे संचालन सार्जंट कोमल चितळे तर आभार अंडर ऑफिसर सुप्रिया यादव हिने केले. यशस्वीतेकरिता आदर्श नाईक अभिषेक नेहारे, व छात्र सैनिकांनी परिश्रम केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये